Join us

Mumbai Megablock: प्रवाशांनो लक्ष द्या... आज मध्य, हार्बर मार्गांवर मेगाब्लॉक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2025 05:42 IST

Mumbai Local Mega Block today: मध्य रेल्वेच्या मध्य आणि हार्बर मार्गावर अभियांत्रिकी कामासाठी मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. जाणून घ्या मेगाब्लॉक काळातील लोकलचे वेळापत्रक कसे असेल?

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि विद्याविहार दरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर रविवारी सकाळी १०:५५ ते दुपारी ३:३५ पर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. तर कुर्ला आणि वाशी अप आणि डाऊन हार्बर मार्गावर ११:१० ते १६:१० दरम्यान ब्लॉक असेल. (Mega block on Sunday Time Table)

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

टर्मिनस येथून सकाळी १०:४८ ते दुपारी ३:३२ पर्यंत सुटणाऱ्या डाऊन धीम्या मार्गावरील लोकल या टर्मिनस आणि विद्याविहार स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवल्या जातील. भायखळा, परळ, दादर, माटुंगा, सायन आणि कुर्ला स्थानकांवर थांबतील. 

पुढे विद्याविहार स्थानकावर डाऊन धीम्या मार्गावर वळवल्या जातील. मशीद, सँडहर्स्ट रोड, चिंचपोकळी आणि करी रोड स्थानकांवर लोकल थांबणार नाहीत. 

घाटकोपर येथून सकाळी १०:२० ते दुपारी ३:३० पर्यंत सुटणाऱ्या अप धीम्या गाड्या विद्याविहार आणि टर्मिनस स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर वळवल्या जातील. 

कुर्ला, सायन, माटुंगा, दादर, परळ आणि भायखळा स्थानकांवर थांबतील. करी रोड, चिंचपोकळी, सँडहर्स्ट रोड आणि मशीद या स्थानकांवर लोकल थांबणार नाहीत.

कुर्ला आणि वाशी अप आणि डाऊन हार्बर मार्गावर ११:१० ते १६:१० पर्यंत ब्लॉक असेल. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी १०:३४ ते दुपारी ३:३६ पर्यंत पनवेल-बेलापूर-वाशी येथे जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. 

पनवेल-बेलापूर-वाशी ते टर्मिनसपर्यंतच्या अप हार्बर मार्गावरील सेवा सकाळी १०:१६ ते दुपारी ३:४७ पर्यंत बंद राहतील. टर्मिनस-कुर्ला आणि पनवेल-वाशी दरम्यान विशेष सेवा चालवल्या जातील, असे रेल्वेने सांगितले.

पश्चिम रेल्वेवर आज काय? 

विरार - चर्चगेट पहिली धिमी लोकल सकाळी ८:०८ वा.भाईंदर - चर्चगेट पहिली लोकल सकाळी ८:२४ वा.विरार - चर्चगेट पहिली जलद लोकल सकाळी ८:१८ वा. चर्चगेट- विरार पहिली जलद लोकल सकाळी ९:०३ वा.

१०० हून अधिक लोकल फेऱ्या रद्द

माहीम ते वांद्रे स्थानकादरम्यान पुलाचा गर्डर बसवण्यासाठी शुक्रवार रात्रीपासून शनिवारी पहाटेपर्यंत घेण्यात आलेल्या ब्लॉकदरम्यान पश्चिम रेल्वेने सुमारे शंभरहून अधिक लोकल फेऱ्या रद्द केल्या. परिणामी, प्रवाशांचे अतोनात हाल झाले. 

सकाळी पीक अवरमध्ये उपनगरांमधून मुंबईत येणाऱ्या प्रवाशांना मनस्ताप सोसावा लागला. अनेकांना कार्यालयाची वेळ गाठता आली नाही. 

शुक्रवारी रात्री १०:२३ नंतर डाउन आणि अप मार्गिकेवरील धिम्या लोकल मुंबई सेंट्रल ते सांताक्रुझदरम्यान जलद मार्गावरून चालविण्यात आल्या. त्यामुळे महालक्ष्मी, लोअर परेल, प्रभादेवी, माटुंगा रोड, माहीम आणि खार रोड स्थानकांवरील प्रवाशांना मनस्ताप झाला. 

शनिवारी सकाळी साडेआठनंतर लोकल या स्थानकांवर लोकल थांबू लागल्या. नियोजित वेळापत्रक कोलमडल्याने बोरीवली, अंधेरी आणि विरारच्या प्रवाशांना लेटमार्क लागला.

टॅग्स :मुंबई लोकल मेगा ब्लॉकमुंबई लोकलरेल्वेमध्य रेल्वेपश्चिम रेल्वे