मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर रविवारी लोकल ब्लॉक; प्रवाशांचे होणार हाल  

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2024 11:08 AM2024-05-25T11:08:20+5:302024-05-25T11:11:25+5:30

मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे घेण्यासाठी रविवारी ब्लॉक घेतला जाणार आहे. 

mumbai mega block on sunday 26 may 2024 in central western and harbour railway  | मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर रविवारी लोकल ब्लॉक; प्रवाशांचे होणार हाल  

मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर रविवारी लोकल ब्लॉक; प्रवाशांचे होणार हाल  

Mega Block On Sunday : मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे घेण्यासाठी रविवारी ब्लॉक घेतला जाणार आहे. 

पश्चिम रेल्वे

१) बोरिवली -गोरेगाव अप आणि डाऊन धीम्या मार्गावर ब्लॉक

सकाळी १० ते दुपारी ३ या ब्लॉक कालावधीत पश्चिम रेल्वे मार्गावर गोरेगाव ते बोरीवली अप आणि डाऊन धीम्या मार्गावरील लोकल जलद मार्गावर वळवण्यात येईल. तसेच अंधेरी ते बोरीवली लोकल हार्बर मार्गावर चालवण्यात येणार आहे. 

२) विरार-वैतरणा विभागादरम्यान पूल क्रमांक ९० वर तुळई बदलण्याचे काम करण्यासाठी पश्चिम रेल्वेवर विरार-वैतरणादरम्यान ब्लॉक घेण्यात येणार आहे.

परिणाम-

२४ मे रोजी रात्रकालीन ब्लॉक आहे. शुक्रवारी रात्री १०:५० ते पहाटे ४:५० वाजेपर्यंत ब्लॉक आहे. ब्लॉकमुळे विरार- डहाणू रोड आणि डहाणू रोड-विरार लोकल रद्द, तर लोकल अंशतः रद्द आहेत. २४ मे रोजी रात्री ९:२० वाजता विरार- डहाणू रोड लोकल रद्द असेल. 

२४ मे रोजी रात्री १०:४५ वाजता डहाणू रोड-विरार लोकल रद्द असेल. २५ मे रोजी पहाटे ४:४० डहाणू रोड-चर्चगेट लोकल ५० मिनिटे, सकाळी ६:०५ डहाणू रोड- चर्चगेट लोकल ५० मिनिटे, पहाटे ५:२५ डहाणू रोड-पनवेल लोकल ५० मिनिटे उशिराने इच्छित स्थानकात पोहोचतील.

मध्य रेल्वे

सकाळी ११.०५ ते दुपारी ३.३५ पर्यंत माटुंगा आणि ठाणे स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन स्लो मार्गावर ब्लॉक असेल. 

परिणाम-

सकाळी १०.१४ ते दुपारी ३.०९ वाजेपर्यंत सीएसएमटीहून सुटणाऱ्या डाऊन स्लो मार्गावरील सेवा माटुंगा आणि ठाणे स्थानकांदरम्यान डाऊन फास्ट मार्गावर वळवण्यात येईल. विद्याविहार, कांजूरमार्ग, नाहूर रेल्वे स्थानकावर लोकल थांबणार नाहीत. पुढे ठाणे स्थानकांवर डाऊन स्लो मार्गावर वळवल्या जातील. लोकल १५ मिनिटे विलंबाने धावतील. सकाळी १०.२५ ते दुपारी ३.१० वाजेपर्यंत कल्याणहून सुटणाऱ्या अप फास्ट मार्गावरील सेवा ठाणे आणि माटुंगा रेल्वे स्थानकादरम्यान अप फास्ट मार्गावर वळवण्यात येईल. नाहूर, कांजूरमार्ग आणि विद्याविहार रेल्वे स्थानकावर लोकल थांबणार नाहीत. पुढे माटुंगा स्थानकावर अप स्लो मार्गावर वळवण्यात येतील.

हार्बर मार्ग-

सीएसएमटी - चुनाभट्टी / वांद्रे डाऊन हार्बर मार्गावर सकाळी ११.४० ते दुपारी ४.४० वाजेपर्यंत आणि चुनाभट्टी / वांद्रे - सीएसएमटी अप हार्बर मार्गावर सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० वाजेपर्यंत ब्लॉक असेल.

परिणाम-

सकाळी ११.१६ ते दुपारी ४.४७ वाजेपर्यंत सीएसएमटी / वडाळा रोडवरून सुटणारी वाशी / बेलापूर / पनवेल डाउन हार्बर मार्गावरील सेवा आणि १०.४८ ते दुपारी ४.४३ वाजेपर्यंत सीएसएमटीहून सुटणारी वांद्रे / गोरेगावकडे जाणारी डाउन हार्बर मार्गावरील सेवा बंद असेल. पनवेल / बेलापूर / वाशीहून सुटणारी सीएसएमटीसाठी सकाळी ९.५३ ते दुपारी ३.२० पर्यंत अप हार्बर मार्गावरील सेवा आणि सीएसएमटीसाठी गोरेगाव / वांद्रेहून सुटणारी अप हार्बर लाईन सेवा सकाळी १०.४५ ते ५.१३ वाजेपर्यंत बंद राहील.

ब्लॉक कालावधीत पनवेल ते कुर्ला दरम्यान विशेष सेवा चालवल्या जातील. हार्बर मार्गावरील प्रवाशांना ब्लॉक कालावधीत सकाळी १० ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेवरून प्रवास करण्याची परवानगी आहे.
 
१) ब्लॉकपूर्वी शेवटची टिटवाळा लोकल सीएसएमटीवरून सकाळी ९.५३ वाजता सुटेल.

२) ब्लॉकनंतर पहिली कल्याण लोकल सीएसएमटीहून दुपारी ३.१८ वाजता सुटेल.
 
३) ब्लॉकपूर्वी पनवेलसाठी शेवटची लोकल सीएसएमटीहून सकाळी ११.०४ वाजता सुटेल.

४) गोरेगावसाठी ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल सीएसएमटीहून सकाळी १०.२२ वाजता सुटेल.

५) ब्लॉकनंतर पनवेलसाठी पहिली लोकल सीएसएमटीहून दुपारी ४.५१ वाजता सुटेल.

६) ब्लॉकनंतर पहिली लोकल सीएसएमटीहून ४.५६ वाजता वांद्र्यासाठी सुटेल.

७) सीएसएमटीसाठी ब्लॉकपूर्वी शेवटची लोकल पनवेलहून सकाळी ९.४० वाजता सुटेल.

८) सीएसएमटीसाठी ब्लॉकपूर्वी शेवटची लोकल वांद्रे येथून सकाळी १०.२० वाजता सुटेल.

९) सीएसएमटीसाठी ब्लॉकनंतर पहिली लोकल पनवेलहून दुपारी ३.२८ वाजता सुटेल.

१०) सीएसएमटीसाठी ब्लॉकनंतर पहिली लोकल गोरेगावहून दुपारी ४.५८ वाजता सुटेल

Web Title: mumbai mega block on sunday 26 may 2024 in central western and harbour railway 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.