मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2026 07:55 IST2026-04-06T07:53:13+5:302026-04-06T07:55:13+5:30

स्वच्छतागृहांची कमतरता, ती नि:शुल्क करण्याचे धोरण, पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्गावर स्वच्छतागृहांची गरज, प्रसाधनगृहांची देखभाल-दुरुस्ती आदी मुद्द्यांवर मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्याशी साधलेला संवाद.

mumbai mayor ritu tawde said striving for an improved policy of free toilets for women in the municipal area | मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर

मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर

विशेष मुलाखत : रितू तावडे, महापौर, मुंबई महानगरपालिका

महिलांसाठी स्वच्छतागृहांची सेवा मोफत देता येणार नाही, अशी भूमिका स्थायी समितीच्या बैठकीत मुंबई महापालिका प्रशासनाने मांडली होती. या पार्श्वभूमीवर स्वच्छतागृहांची कमतरता, ती नि:शुल्क करण्याचे धोरण, पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्गावर स्वच्छतागृहांची गरज, प्रसाधनगृहांची देखभाल-दुरुस्ती आदी मुद्द्यांवर मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्याशी साधलेला संवाद.

  • प्रश्न - महिलांसाठीची स्वच्छतागृहे मोफत करता येणार नाहीत, या प्रशासनाच्या भूमिकेमागचे नेमके कारण काय आहे?
  • उत्तर - “पैसे द्या व वापरा’’ या धोरणानुसार बांधलेल्या सार्वजनिक स्वच्छतागृहांमध्ये महिलांकरिता युरिनल्स मोफत आहेत. तथापि, स्वच्छतागृहांच्या वापराकरिता नाममात्र शुल्क आकारण्यात येते. ज्या संस्थांना स्वच्छतागृहे चालविण्याकरिता देण्यात आली आहेत, त्या शुल्क आकारणीतून देखभाल खर्च भागवितात.
  • प्रश्न - महापौर म्हणून आपण काय करू शकता?
  • उत्तर - महिलांकरिता सार्वजनिक स्वच्छतागृहे नि:शुल्क करण्याबाबतचे सुधारित धोरण तयार करण्याचा माझा प्रयत्न आहे. 
  • प्रश्न - महिलांसाठी आजही पुरेशी आणि स्वच्छ स्वच्छतागृहे नाहीत...
  • उत्तर - महिलांसाठी प्रत्येक वॉर्डात किती स्वच्छतागृहांची गरज आहे, याची माहिती घेऊन टप्प्याटप्प्याने स्वच्छतागृहे बांधली जातील.
  • प्रश्न -  महापालिकेची आणि खासगी मालकीची किती स्वच्छतागृहे आहेत?
  • उत्तर - वस्ती स्वच्छता कार्यक्रमांतर्गत लॉट १ ते ११ मध्ये  १,७५२ स्वच्छतागृहे ३८,३२४ शौचकुपांसह बांधली आहेत. लॉट १२ अंतर्गत ५९४ स्वच्छतागृहे १५,११४ शौचकुपांसहित बांधण्याचे प्रस्तावित आहे. त्यांपैकी ११३ स्वच्छतागृहांतील २,३७३ शौचकुपांचे बांधकाम पूर्ण झाले आहे. १३० स्वच्छतागृहांतील २,७३० शौचकुपांचे बांधकाम प्रगतिपथावर आहे.
  • प्रश्न - अनेक स्वच्छतागृहांची नीट देखभाल-दुरुस्ती होत नाही. निधी अपुरा आहे, की नियोजनाचा अभाव आहे?
  • उत्तर - देखभाल आणि दुरुस्तीकरिता पुरेसा निधी आहे. तरीही आवश्यक तेथे सुधारणा करण्यात येतील.
  • प्रश्न - पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्गावर प्रसाधनगृहांची संख्या कशी वाढवता येईल?
  • उत्तर - दोन्ही महामार्गांवर प्रत्येकी ३ याप्रमाणे सहा ठिकाणी स्वच्छतागृहे आहेत. आणखी स्वच्छतागृहे बांधण्याबाबत संबंधित सहायक आयुक्तांकडून जागेची पडताळणी चालू आहे. 
  • प्रश्न - आकांक्षा प्रसाधनगृहांबद्दल काय सांगाल?
  • उत्तर - मुंबई शहर विभागामध्ये धार्मिक, सांस्कृतिक व पर्यटन, अशा ७ ठिकाणी आकांक्षा प्रसाधनगृहे बांधण्यात येत आहेत. त्यात पुरुष व स्त्रियांव्यतिरिक्त, विकलांग, तृतीयपंथी यांकरिता शौचकूप, तसेच चेंजिंग रूम, बेबी फीडिंग रूम इत्यादी व्यवस्था करण्यात येतील. ७ पैकी ५ ठिकाणचे काम पूर्ण झाले असून, २ प्रसाधनगृहे सुरू करण्यात आली आहेत.

Web Title : मुंबई महापौर शहर में महिलाओं के लिए मुफ्त शौचालय के लिए प्रयासरत!

Web Summary : मुंबई की महापौर का लक्ष्य महिलाओं के लिए मुफ्त शौचालयों की नीति को संशोधित करना है। वर्तमान उपयोगकर्ता शुल्क रखरखाव को कवर करते हैं। प्रत्येक वार्ड में अधिक शौचालयों की योजना है। नई सुविधाओं में विकलांग और ट्रांसजेंडर व्यक्तियों के लिए प्रावधान शामिल होंगे।

Web Title : Mumbai Mayor Pushes for Free Toilets for Women in City.

Web Summary : Mumbai's Mayor aims to revise policy for free women's toilets. Current user fees cover maintenance. More toilets planned per ward. New facilities will include provisions for disabled and transgender individuals.