मुंबई मराठी साहित्य संघाचे पुरस्कार जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2017 03:32 IST2017-10-20T03:32:13+5:302017-10-20T03:32:28+5:30

मुंबई मराठी साहित्य संघाने नुकतेच साहित्य व नाट्य क्षेत्रातील पुरस्कारांची घोषणा केली आहे. या पुरस्कारांचे वितरण संघाच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून २७ व २८ आॅक्टोबर रोजी केले जाणार आहे.

 Mumbai Marathi Sahitya Sangha Award | मुंबई मराठी साहित्य संघाचे पुरस्कार जाहीर

मुंबई मराठी साहित्य संघाचे पुरस्कार जाहीर

मुंबई : मुंबई मराठी साहित्य संघाने नुकतेच साहित्य व नाट्य क्षेत्रातील पुरस्कारांची घोषणा केली आहे. या पुरस्कारांचे वितरण संघाच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून २७ व २८ आॅक्टोबर रोजी केले जाणार आहे.
मुंबई मराठी साहित्य संघातर्फे डॉ.भालेराव कुटुंबिय पुरस्कृत मराठी यशवंत पुरस्कार ज्येष्ठ संगीतकार यशवंत देव यांना जाहीर झाला आहे. तर सहचारिणी पुरस्कार प्रभाताई पुरोहित यांना घोषित झाला आहे. तर प्रा.रमेश पानसे यांना रा.भि.जोशी स्मृतिप्रित्यर्थ पुरस्कार देण्यात येणार आहे. तर लक्ष्मीकांत बाबुराव चंद्रगिरी स्मृती पुरस्कार डॉ.सुधीर रसाळ यांना जाहीर झाला आहे. कथाकार शांताराम पुरस्कार प्रमोद बोरसारे, माधव ज्युलियन स्मृती पुरस्कार दीपक पवार, के.ना काळे पुरस्कार अतुल पेठे आणि बालसाहित्य पुरस्कार ज्योत्स्ना शिंत्रे यांना घोषित झाला आहे. नाट्य क्षेत्रातील कै. बापूराव पेंढारकर स्मृती समिती पुरस्कृत प्रायोगिक रंगभूमी संस्था इंद्रधनूचा गौरव करण्यात येणार आहे.

Web Title:  Mumbai Marathi Sahitya Sangha Award