Join us

मुंबई : पाच दिवस सांताक्रूझ, वांद्रेत कमी दाबाने पाणीपुरवठा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2023 13:05 IST

सांताक्रूझ (पूर्व) परिसरात जलवाहिनी दुरुस्तीची दोन कामे केली जाणार आहेत.

मुंबई : सांताक्रूझ (पूर्व) येथील टीचर्स कॉलनी स्मशानभूमीजवळच्या १ हजार २०० मिलिमीटर व्यासाच्या जलवाहिनीच्या मजबुतीकरणाचे काम हाती घेण्यात येणार आहे. तसेच हंसबुर्गा रोड पुलाखालील वैतरणा जलवाहिनीवरील गळती दुरुस्तीचेही काम केले जाणार आहे. या कामांमुळे ४ ते ८ जूनदरम्यान एच/पूर्व विभागातील काही परिसरात कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असल्याची माहिती पालिकेने दिली आहे.

सांताक्रूझ (पूर्व) परिसरात जलवाहिनी दुरुस्तीची दोन कामे केली जाणार आहेत. या कामांमुळे वांद्रे-कुर्ला संकुल, सांताक्रूझ या परिसरात कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा आवश्यक साठा करून ठेवावा. तसेच काटकसरीने पाणी वापरावे, असे आवाहन पालिकेने केले आहे.

कुठे, कधी कमी दाबाने होणार पाणीपुरवठारविवार ४ जून : वांद्रे-कुर्ला संकुल येथील पाणीपुरवठा सकाळी ८:३० ते १०:४५ पर्यंत होईल.सोमवार ५ जून : संपूर्ण एच/पूर्व विभागात पाणीपुरवठा कमी दाबाने होईल.मंगळवार ६ जून : संपूर्ण एच/पूर्व विभागात पाणीपुरवठा कमी दाबाने होईल.सोमवार ५ ते ८ जून :   एच/पूर्व विभागातील भारतनगर, वाल्मीकीनगर, महाराष्ट्र नगर, वांद्रे-कुर्ला संकुल.

टॅग्स :पाणीमुंबई