Join us

मुंबई - लंडन विमानाला सहा तासांचा विलंब, एअर इंडिया विमानातील तांत्रिक दोषामुळे मनस्ताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2025 10:43 IST

Mumbai-London flight News: एअर इंडियाच्या मुंबई ते लंडन विमानात तांत्रिक दोष निर्माण झाल्यामुळे या विमानाने सहा तास विलंबाने उड्डाण केले. याचा मोठा त्रास प्रवाशांना सोसावा लागला. ही घटना शनिवारी सकाळी घडली.

मुंबई - एअर इंडियाच्यामुंबई ते लंडन विमानात तांत्रिक दोष निर्माण झाल्यामुळे या विमानाने सहा तास विलंबाने उड्डाण केले. याचा मोठा त्रास प्रवाशांना सोसावा लागला. ही घटना शनिवारी सकाळी घडली.

एअर इंडियाचे एआय १२९ हे विमान सकाळी साडे सहा वाजता लंडनसाठी उड्डाण करणे अपेक्षित होते. मात्र, विमानात प्रवासी बसल्यानंतर जवळपास दीड तासाने विमानात तांत्रिक दोष असल्याचे सांगत प्रवाशांना विमानातून बाहेर काढण्यात आले. त्यानंतर विमान दुपारी १२ वाजता लंडनसाठी रवाना होईल, अशी घोषणा कंपनीतर्फे करण्यात आली.

सकाळी लवकरचे विमान असल्यामुळे प्रवासी पहाटे लवकर विमानतळावर पोहोचले होते. त्यामुळे त्यांची झोपदेखील अपुरी झाली होती. १२ वाजता विमान उड्डाण करेल, अशी घोषणा करूनही त्यावेळी विमानाने उड्डाण केले नाही. अखेरीस दुपारी १ वाजता विमानाने उड्डाण केले.

English
हिंदी सारांश
Web Title : Air India Mumbai-London Flight Delayed Six Hours Due to Technical Fault

Web Summary : An Air India flight from Mumbai to London was delayed by six hours Saturday due to a technical fault. Passengers faced significant inconvenience. The AI 129 flight, scheduled for 6:30 AM, finally departed at 1 PM after passengers were deboarded for repairs, disrupting travel plans.
टॅग्स :एअर इंडियामुंबई