मुंबई : मध्य रेल्वेतर्फे ओव्हरहेड इक्विपमेंट कामासाठी अडथळा दूर करण्याच्या पूर्वतयारीसाठी कसारा (इगतपुरी-खर्डी सेक्शन) येथे विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकचा मेल आणि एक्स्प्रेस गाड्यांवर कोणताही परिणाम होणार नाही. मात्र, लोकल सेवेला याचा फटका बसणार आहे.
१२ व १३ मे रोजी १५:५० ते १७:५० वाजेपर्यंत रोज २ तासांचा ब्लॉक असेल, तर १४ ते १६ मे रोजी मध्यरात्री ३ ते ५ ब्लॉक असणार आहे. इगतपुरी - कसारा विभागातील दोन्ही लाइन्सवर हा ब्लॉक घेतला जाईल.
ब्लॉकवरील कालावधीत या मार्गावर उपनगरीय सेवा धावणार नाहीत. १२ मे आणि १३ मे रोजी सीएसएमटी येथून १३:१०, १४:१७ आणि १४:४६ वाजता सुटणाऱ्या कसारा लोकल आसनगावपर्यंत धावतील.
कसारा - सीएसएमटी लोकल आसनगाव येथून सुटतील. यात कसारा येथून १५:३५ वा. सुटणारी ट्रेन आसनगाव येथून १६:१२ वा. सुटेल. कसारा येथून १६:१६ वाजता सुटणारी गाडी आसनगाव येथून १६:५४ वाजता सुटेल. कसारा येथून १७:०२ वा. सुटणारी ट्रेन आसनगाव येथून १७:३९ वाजता सुटणार आहे.
Web Summary : Central Railway's power block in Kasara from May 12-16 will impact local train services. Several Kasara-bound locals will terminate at Asangaon, with corresponding return trips originating from there. Express trains remain unaffected.
Web Summary : मध्य रेलवे के कसारा में 12-16 मई तक पावर ब्लॉक से लोकल ट्रेन सेवाएं प्रभावित होंगी। कई कसारा जाने वाली लोकल ट्रेनें आसनगाँव पर समाप्त होंगी, और वापसी यात्राएँ वहीं से शुरू होंगी। एक्सप्रेस ट्रेनें अप्रभावित रहेंगी।