Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2025 19:50 IST2025-11-08T19:38:33+5:302025-11-08T19:50:18+5:30
Mumbai Local Sunday Mega Block: मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गावर रविवारी (०९ नोव्हेंबर २०२५) मेगाब्लॉक जाहीर करण्यात आला.

Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
Mumbai Local Mega Block: मुंबईकरांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गावर रविवारी (०९ नोव्हेंबर २०२५) मेगाब्लॉक असणार आहे. रेल्वे मार्गाच्या दुरुस्ती, देखभाल आणि अभियांत्रिकी कामांसाठी हा ब्लॉक घेतला जाणार असून, प्रवाशांना अनावश्यक प्रवास टाळण्याचे आवाहन प्रशासनाने केले. त्यामुळे प्रवाशांनी रेल्वेचे वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडण्याचे नियोजन आखावे.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथून सकाळी १०.३६ ते दुपारी ०३. १० या वेळेत सुटणाऱ्या डाउन जलद मार्गावरील गाड्या माटुंगा स्थानकावरून डाउन धीम्या मागविर वळवल्या जातील. या गाड्या माटुंगा ते मुलुंड दरम्यानच्या सर्व नियोजित स्थानकांवर थांबतील आणि त्यांच्या गंतव्य स्थानकांवर सुमारे १५ मिनिटे उशिराने पोहोचतील. ठाणेनंतरच्या गाड्या मुलुंड स्थानकावरून पुन्हा डाउन जलद मार्गावर वळवल्या जातील.
ठाणे येथून सकाळी ११.०३ ते दुपारी ०३.३८ या वेळेत सुटणाऱ्या अप जलद मार्गावरील गाड्या मुलुंड स्थानकावरून अप धीम्या मार्गावर वळवल्या जातील. या गाड्या मुलुंड ते माटुंगा दरम्यानच्या सर्व नियोजित स्थानकांवर थांबतील. त्यानंतर माटुंगा स्थानकावरून पुन्हा अप जलद मार्गावर वळवल्या जातील आणि त्यांच्या गंतव्य स्थानकांवर सुमारे १५ मिनिटे उशिराने पोहोचतील.
कुर्ला आणि वाशी स्थानकांदरम्यान अप व डाउन हार्बर मार्गावर सकाळी ११.१० ते दुपारी ०४.१० या वेळेत ब्लॉक राहील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी १०.३४ ते दुपारी ०३.३६ या वेळेत सुटणाऱ्या वाशी/बेलापूर/पनवेलकडे जाणाऱ्या डाउन हार्बर मार्गावरील गाड्या तसेच पनवेल/बेलापूर/वाशी येथून सकाळी १०.१७ ते दुपारी ०३.४७ या वेळेत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबईकडे येणाऱ्या अप हार्बर मार्गावरील गाड्या रद्द राहतील.
ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई- कुर्ला तसेच पनवेल -वाशी या विभागांदरम्यान विशेष उपनगरी गाड्या चालवल्या जातील. ब्लॉक कालावधीत सकाळी १०.०० ते संध्याकाळी ०६.०० या वेळेत हार्बर मार्गावरील प्रवाशांना ठाणे-वाशी/नेरुळ दरम्यान प्रवास करण्याची परवानगी दिली जाईल.