Mumbai Local Mega Block: प्रवास खोळंबा; तिन्ही मार्गांवर उद्या मेगाब्लॉक; अनेक फेऱ्या रद्द होणार असल्याने प्रवासजाच
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2026 07:24 IST2026-01-24T07:23:13+5:302026-01-24T07:24:04+5:30
Mumbai Local Mega Block News: ब्लॉक कालावधीत काही लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणार

Mumbai Local Mega Block: प्रवास खोळंबा; तिन्ही मार्गांवर उद्या मेगाब्लॉक; अनेक फेऱ्या रद्द होणार असल्याने प्रवासजाच
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: मध्य रेल्वेच्या माटुंगा ते मुलुंड आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) ते चुनाभट्टी/वांद्रेदरम्यान ब्लॉक नियोजित केला आहे, तर पश्चिम रेल्वे अंधेरी ते गोरेगाव आणि माहीम ते अंधेरीदरम्यान ब्लॉक घेणार आहे. ब्लॉक कालावधीत काही लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणार असून, काही लोकल विलंबाने धावणार आहेत. त्यामुळे या दिवशी मुंबईकरांचा प्रवास खोळंबा होणार आहे.
कोणत्या मार्गावर, काय परिणाम होणार?
- स्थानक : अंधेरी ते गोरेगाव आणि माहीम ते अंधेरी
- मार्ग : हार्बर
- वेळ : सकाळी १० ते दुपारी ३ आणि सकाळी ११ ते दुपारी ४
- परिणाम : चर्चगेट ते गोरेगाव, सीएसएमटी ते वांद्रे, सीएसएमटी ते वांद्रे या मार्गांवरील अप आणि डाउन लोकल फेऱ्या रद्द राहणार आहेत.
- स्थानक : सीएसएमटी ते चुनाभट्टी / वांद्रे
- मार्ग : अप आणि डाउन
- वेळ : स. ११:४० ते दु. ४:४०
- परिणाम : सीएसएमटी ते वाशी / बेलापूर /पनवेल आणि सीएसएमटी ते वांद्रे / गोरेगाव या मार्गावरील अप, डाउन लोकल फेऱ्या रद्द.
- स्थानक : माटुंगा ते मुलुंड
- मार्ग : अप आणि डाउन जलद
- वेळ : सकाळी ११:०५ ते दुपारी ३:४५
- परिणाम : ब्लॉक वेळेत अप आणि डाउन जलद मार्गावर धावणाऱ्या लोकल फेऱ्या अप आणि डाउन धीम्या मार्गावरून चालवण्यात येणार आहेत. यामुळे काही लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणार असून, काही लोकल फेऱ्या विलंबाने धावणार आहेत.