Mumbai: प्रियदर्शनी पार्कजवळ जमीन खचली, ४० ते ५० दुचाकी आणि काही कार खड्डयात पडल्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2023 12:16 IST2023-07-05T12:16:03+5:302023-07-05T12:16:20+5:30
Mumbai: सुमननगर प्रियदर्शनी पार्कजवळ जमीन खचली असून, जमीन खचल्यामुळे झालेल्या खड्ड्यात ४० ते ५० दुचाकी आणि काही कार या कोसळल्या आहेत.

Mumbai: प्रियदर्शनी पार्कजवळ जमीन खचली, ४० ते ५० दुचाकी आणि काही कार खड्डयात पडल्या
मुंबई - सुमननगर प्रियदर्शनी पार्कजवळ जमीन खचली असून, जमीन खचल्यामुळे झालेल्या खड्ड्यात ४० ते ५० दुचाकी आणि काही कार या कोसळल्या आहेत. ही घटना वसंत दादा पाटील इंजिनियर समोरील राहुलनगर दोन येथील SRA बिल्डिंग समोर घडली आहे. जमीन खचल्याने शेजारील इमारतीत राहणाऱ्या रहिवाशांनी घरातून बाहेर धाव घेतली आहे. त्यनंतर खबरदारीचा उपाय म्हणून संपूर्ण इमारत खाली करण्यात आली आहे व SRAमधील नागरिकांचे काही वाहने खचलेल्या खड्डयात कोसळले आहे. दरम्यान, घटनास्थळी मुंबई अग्निशामक दल पोलिस कर्मचारी उपस्थित आहेत.