Join us

इथेही मुंबई नंबर वन; अपघातात २३ टक्के घट 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2024 10:24 IST

२०२३ मध्ये अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांची टक्केवारीमध्ये जास्त घट असणाऱ्या राज्यातील प्रथम क्रमांक मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्याला मिळाला आहे.

मुंबई : रस्ते अपघातामध्ये वर्ष २०२२ च्या तुलनेत वर्ष २०२३ मध्ये अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांची टक्केवारीमध्ये जास्त घट असणाऱ्या राज्यातील प्रथम क्रमांक मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्याला मिळाला आहे, तर चंद्रपूर दुसऱ्या, तर नवी मुंबई तिसऱ्या स्थानी आहे.  या  तीन जिल्ह्यांच्या रस्ता सुरक्षा समितीचा  सत्कार करण्यात आला. मुंबई शहरसाठी रस्ते सुरक्षा उपायुक्त भरत कळसकर, वडाळा आरटीओ प्रभारी प्रादेशिक परिवहन अधिकारी विनय अहिरे आणि  अंधेरी प्रादेशिक परिवहन अधिकारी अशोक पवार यांचा सन्मान  करण्यात आला. 

विविध उपाययाेजना :

 राज्य शासनाने अधिसूचित केल्याप्रमाणे जिल्ह्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय जिल्हा रस्ता सुरक्षा समितीद्वारे अपघात कमी होण्याकरिता विविध उपाययोजना करण्यात येतात.

 जिल्हा रस्ता सुरक्षा समितीच्या बैठका घेऊन मार्गदर्शन करण्यात येते.  हेल्मेट तपासणी, मर्यादेपेक्षा अतिवेगाने धावणाऱ्या वाहनांवर कारवाई, दारू पिऊन वाहन चालविणाऱ्या चालकांवर कारवाई, आदी बाबतीत मोहिमा घेऊन  कारवाई करण्यात आली.

टॅग्स :मुंबईअपघातआरटीओ ऑफीस