Join us

Mumbai: भारत मोठा होणे ही विश्वाची आवश्यकता आहे, सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांचं विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2023 21:59 IST

Mumbai: प्रसिद्ध उद्योगपती आणि विश्व हिंदू परिषदेचे उपाध्यक्ष माननीय अशोकराव चौगुले यांच्या अमृत महोत्सवाचा कार्यक्रम आज रवींद्र नाट्यमंदिर येथे विवेक व्यासपीठने  आयोजित केला होता.

मुंबई - प्रसिद्ध उद्योगपती आणि विश्व हिंदू परिषदेचे उपाध्यक्ष माननीय अशोकराव चौगुले यांच्या अमृत महोत्सवाचा कार्यक्रम आज रवींद्र नाट्यमंदिर येथे विवेक व्यासपीठने  आयोजित केला होता. याप्रसंगी अशोकरावांचे अभिष्टचिंतन करताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहनजी भागवत यांनी "तत्व व्यवहारात येथे ,तेच सत्य असते आणि अशोकरावांनी ते आपल्या व्यवहाराने सत्यात उतरवले " असे गौरवोद्गार काढले तसेच "भारत मोठा होणे ही विश्वाची आवश्यकता आहे.येत्या वीस तीस वर्षात भारत विश्वगुरु होईलच पण त्यासाठी सक्रिय राहावे लागेल आणि त्यासाठी अशोकजींचे प्रेरणादायी काम ज्याचे अनुकरण होण्यासाठीच या अमृत महोत्सवाचे प्रयोजन आहे. असे प्रतिपादन केले.

अशोकराव चौगुले अमृत महोत्सव समितीचे अध्यक्ष गोविंदगिरीजी महाराज यांनी आपल्या उद्बोधनात " मागील ४० वर्ष हिंदूंच्या पुनरुत्थानात अशोकजींचे महत्वपूर्ण योगदान आहे हे सांगतानाच हे फक्त हिमनगाचे टोक आहे त्यांचे भरपूर कार्य हे शांतपणे सुरु आहे" असे गौरवोद्गार काढले.

याप्रसंगी दोन इंग्रजी पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले.त्याचे संपादन करणाऱ्या अरविंद सिंग व या कार्यक्रमाचे आर्ट डायरेक्टर गोपी कुकडे यांचा सरसंघसंचालकांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.अशोकराव चौगुले यांनी आपले मनोगत व्यक्त करताना आपल्या संघकार्याला उजाळा दिला व संघ, विश्व हिंदू परिषद आणि राम जन्मभूमी आंदोलनातील अनुभवांचे कथन केले.

पद्मश्री ब्रम्हेशानंद आचार्य स्वामी यांनी त्यांना हजारोंचा पोशिंदा म्हणतानाच त्यांच्या हिंदुत्वासाठी गोमंतकात उभ्या केलेल्या कामांचा गौरव केला. कार्यक्रमाच्या सुरवातीला सरसंघसंचालकांनी अशोकराव चौगुले आणि सौ सुधा चौगुले यांचा सत्कार केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रमोद पवार यांनी केले  व्यासपीठावर मंगलप्रभात लोढा, दिलीप करंबेळकर, मिलिंद परांडे  , श्रीपाद नाईक हे ही उपस्थित होते

टॅग्स :मोहन भागवतराष्ट्रीय स्वयंसेवक संघभारत