धोक्याची घंटा: निसर्ग रागावला, आता माणसाने शहाणपणाने वागावे!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2026 16:09 IST2026-03-23T16:08:57+5:302026-03-23T16:09:48+5:30

२३ मार्च १९५० रोजी जागतिक हवामान संघटनेची स्थापना झाल्याची आठवण म्हणून हा दिवस पाळला जातो.

mumbai heat wave now man should act wisely | धोक्याची घंटा: निसर्ग रागावला, आता माणसाने शहाणपणाने वागावे!

धोक्याची घंटा: निसर्ग रागावला, आता माणसाने शहाणपणाने वागावे!

मुंबई :

२३ मार्च १९५० रोजी जागतिक हवामान संघटनेची स्थापना झाल्याची आठवण म्हणून हा दिवस पाळला जातो. हवामान बदलाच्या आव्हानांविषयी जागृती करणे आणि मानवी सुरक्षिततेसाठी वातावरणीय विज्ञानाचे महत्त्व अधोरेखित करणे, हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे.

२०२६ ची थीम 'आजचे निरीक्षण, उद्याचे रक्षण' अशी आहे. हा दिवस नैसर्गिक आपत्तींचा अंदाज वर्तवण्यामध्ये आणि हवामान बदलाच्या गंभीर परिणामांबद्दल (पूर, दुष्काळ, उष्णतेची लाट) समाजात जागरूकता निर्माण करतो. निसर्ग रागावला असून आता मानवाने शहाणे होणे गरजेचे आहे.

'आजचे निरीक्षण, उद्याचे रक्षण'
तापमान वाढीमुळे हवामानात बदल होऊन उष्ण लहरीत वाढ, अति पाऊस, हवेचा दाब, आर्द्रता आणि वाऱ्याच्या दिशेवर विपरीत परिणाम होणार आहे. मुंबई हे शहर समुद्र किनारी असल्याने तिथे दमट हवामान असते.

खूप थंडी किंवा खूप उष्णता तिथे नसावी, असे अपेक्षित आहे. परंतु, गेल्या दोन दशकातील मुंबईचे बदलत चाललेले हवामान, पाऊस आणि तापमान पाहता भविष्यात ही धोक्याची घंटा समजली पाहिजे.

तापमानाचा पारा : वर्षागणिक वाढता
वर्ष    तापमान
२०११ >>    ४१.३
२०१२     >> ३९.५
२०१३     >> ४०.५
२०१४     >> ३८
२०१५     >> ४०.८
२०१६     >> ३६.९
२०१७  >>    ३८.४
२०१८     >> ४१
२०१९     >> ४०.३
२०२०     >> ३७.३
२०२१     >> ४०.९
२०२२     >> ३९.६
२०२३     >> ३९.४

 

२००० पासून उष्ण लहरीचे प्रमाण वाढत आहे.

२०१० ते २०२२ हे सर्वाधिक तापमानाचे वर्ष ठरले.

२०१६ आणि २०२२ हे उष्ण लहरीचे वर्ष ठरले.

कुलाबा येथील १९९१-२०२० काळातील वार्षिक सर्वाधिक तापमान आकडेवारी पाहिल्यास मुंबईच्या हवामान बदलाची गंभीरता लक्षात येते.

 

Web Title : जलवायु परिवर्तन: प्रकृति की चेतावनी; मनुष्य अब समझदारी से कार्य करें!

Web Summary : विश्व मौसम विज्ञान दिवस जलवायु परिवर्तन के प्रभावों पर प्रकाश डालता है। मुंबई का बढ़ता तापमान और चरम मौसम की घटनाएं एक खतरनाक प्रवृत्ति का संकेत देती हैं। भविष्य की सुरक्षा के लिए अवलोकन महत्वपूर्ण हैं, जलवायु जोखिमों को कम करने के लिए तत्काल कार्रवाई की आवश्यकता है।

Web Title : Climate change: Nature's warning; humans must act wisely now!

Web Summary : World Meteorological Day highlights climate change impacts. Mumbai's rising temperatures and extreme weather events signal a dangerous trend. Observations are key to future protection, demanding immediate action to mitigate climate risks.