मुंबई :मुंबईची वर्षभराची तहान भागवण्यासाठी १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर पाण्याची गरज असते. १ ऑक्टोबरला सकाळी घेतलेल्या नोंदीनुसार सातही धरणांमध्ये १४ लाख २८ हजार ५४९ दशलक्ष लिटर (९८.७० टक्के) एवढा पाणीसाठा जमा झाला आहे. त्यामुळे हा साठा ३५९ दिवस पुरेल, असा दावा पालिकेने केला आहे.
मुंबईला अपर वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी या धरणांतील पाण्याचा पुरवठा केला जातो. या धरणांमध्ये १४ लाख २८ हजार ५४९ दशलक्ष लिटर (एक लाख ४२ हजार ८५४ कोटी लिटर) पाणीसाठा जमा झाला आहे. जुलैपासून या सर्व धरणांतील पाणीसाठा हा मागील दोन वर्षांच्या तुलनेत दुपटीने पुढे होता. त्यामुळे काही दिवस धरणाचे दरवाजे उघडून त्यातील पाणी सोडण्याची वेळ आली होती.
शेवटच्या तीन ते चार दिवसांत धरण क्षेत्रांत पाऊस न पडल्याने धरणांतील साठा जो २७ सप्टेंबरला जेवढा होता, त्यात वाढ होण्याऐवजी तो कमी झाला. त्यामुळे २७ सप्टेंबरला या सर्व धरणांतील पाणीसाठा ९९.१३ टक्के एवढा होता, तो आता कमी होऊन १ ऑक्टोबरला ९८.७० टक्क्यांवर आला आहे.
१ ऑक्टोबरचा मागील तीन वर्षांतील पाणीसाठा
२०२५ : ९८.७०% (१४,२८,५४९ दशलक्ष लि.)२०२४ : ९९.३७% (१४,३८,२२७ दशलक्ष लि.)२०२३ : ९९.१८% (१४,३५,४५९ दशलक्ष लि.)
धरणांनिहाय १ ऑक्टोबरची नोंदधरण पाणीसाठा टक्के(दशलक्ष लिटर)अपर वैतरणा २,२६,०८३ ९९.५८ मोडकसागर १,२८,९२५ १०० तानसा १,४३,२९९ ९८.७७ मध्य वैतरणा १,९२,८२५ ९९.६४ भातसा ७,०१,६७३ ९७.८६ विहार २७,६९८ १०० तुळशी ८,०४६ १००
Web Summary : Mumbai's seven dams hold 98.70% of required water as of October 1st, totaling 14.28 lakh million liters. This can supply water for 359 days. The water level in dams was twice the level of last two years in July but recent lack of rain has slightly decreased it.
Web Summary : मुंबई के सात बांधों में 1 अक्टूबर तक आवश्यक पानी का 98.70% यानी 14.28 लाख मिलियन लीटर जमा है। इससे 359 दिनों तक पानी की आपूर्ति हो सकती है। जुलाई में बांधों में जल स्तर पिछले दो वर्षों के स्तर से दोगुना था, लेकिन हाल ही में बारिश की कमी से इसमें थोड़ी कमी आई है।