Join us
Daily Top 2Weekly Top 5

मतदानाला मास्क घालूनच बाहेर पडा; मुंबईत विविध ठिकाणच्या प्रकल्पांमुळे हवेचा दर्जा घसरला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2026 06:44 IST

शुक्रवारपर्यंत प्रदूषण राहणार

मुंबई : मतदानाला मास्क घालूनच बाहेर पडावे लागेल. दक्षिण भारतातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मुंबईसह राज्यातील हवामानात बदल झाले असून, मुंबईसह लगतच्या हवेत ओलावा आला आहे. त्यामुळे प्रदूषके हवेत राहिल्याने मुंबईवर धुरक्याचे जाळे मतमोजणीच्या दिवसापर्यंत कायम राहाणार आहे. मंगळवारी पुन्हा मुंबईतील दृश्यमानता कमी झाली होती. 

असलेल्या सातत्याने वाढत प्रदुषणाच्या पार्श्वभूमीवर महामुंबईतील हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी न्यायालयाच्या सूचनेप्रमाणे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने तपासणी पथकांची स्थापना केली आहे. पथकांनी आरएमसी प्लॅट व बांधकाम सुरू असलेल्या प्रकल्पांची. तपासणीअंती पर्यावरण विषयक मार्गदर्शक सूचनांचे पालन करत नसल्याबद्दल त्यांच्यावर कारवाई केली जाते.

का आहे हवा खराब ?

औद्योगिक उत्सर्जन, बांधकामांच्या ठिकाणी निर्माण होणारी धूळ, रस्त्यावरील धुळीचे पुनर्प्रक्षेपण, कारखान्यातील उत्सर्जन, कचरा जाळणे, कारखाने व वाहनातून निघणारा धूर यामुळे प्रदूषण वाढते. मुंबईच्या नैसर्गिक हवामानाच्या स्थितीनुसार दरवर्षी ऑक्टोबर ते फेब्रुवारी या कालावधीत प्रदूषणाच्या प्रमाणात वाढ होत आहे.

या उपाययोजना करता येतील

बांधकाम प्रकल्पाच्या सभोवताली पत्र्यांचे कुंपण उभारणे, हिरव्या कपड्यांचे आच्छादन, पाणी-फवारणी, राडारोडयाची शास्त्रशुद्ध साठवण व ने-आण, बांधकामाच्या ठिकाणी वायू-प्रदूषण मोजमाप करणारी यंत्रणा, धूरशोषक यंत्रे बसविणे, अशा उपाययोजना करता येतील. नागरिकांनी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वेबसाइटवरील प्रदूषकाची पातळी किंवा समीर अॅपवरील निर्देशांक गृहीत धरावा, असे आवाहन पालिकेने केले आहे. 

टॅग्स :महानगरपालिका निवडणूक २०२६मुंबई महापालिका निवडणूक २०२६प्रदूषण