मुंबईतील घाटकोपरमध्ये दरड कोसळली; परिसरात खळबळ; दहा ते बारा झोपड्या रिकाम्या केल्या

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2024 01:05 AM2024-04-13T01:05:55+5:302024-04-13T01:11:48+5:30

काही घरांचे मोठे नुकसान झाले आहे. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती समोर आली आहे. 

mumbai ghatkopar valmikinagar landslide | मुंबईतील घाटकोपरमध्ये दरड कोसळली; परिसरात खळबळ; दहा ते बारा झोपड्या रिकाम्या केल्या

मुंबईतील घाटकोपरमध्ये दरड कोसळली; परिसरात खळबळ; दहा ते बारा झोपड्या रिकाम्या केल्या

मुंबईतील घोटकोपरमधून एक मोठी घटना समोर आली आहे. येथील हिमालय सोसायटी समोरील वाल्मिकीनगर या डोंगराळ झोपडपट्टी परिसरात शुक्रवारी १२ एप्रिल रोजी रात्री १० च्या सुमारास दरड कोसळली. यामुळे काही घरांचे मोठे नुकसान झाले आहे. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती समोर आली आहे. 

या घटनेची माहिती मिळताच परिसरात खळबळ उडाली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव १० ते १२ झोपडपट्टी रिकाम्या करण्यात आल्या आहेत. घटनास्थळी मुंबई पोलिस आणि अग्निशमन दल दाखल झाले आहे.

Web Title: mumbai ghatkopar valmikinagar landslide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई