अंधेरी पश्चिम येथील आझाद नगर मेट्रो स्थानकाजवळ गुरुवारी चार बेस्ट बस एकमेकांवर आदळल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली. या अपघातात एक बस कंडक्टर गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारांसाठी तात्काळ रुग्णालयात हलवण्यात आले आहे. याप्रकरणी स्थानिक पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून हा अपघात नेमका कशामुळे झाला? याबाबत तपास सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आझाद नगर मेट्रो स्थानकाबाहेर नेहमीप्रमाणे वाहतुकीची वर्दळ होती. यावेळी चार बेस्ट बस एकमेकांवर आदळल्या. गंभीररित्या जखमी झाला आहे. घटनेनंतर स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी धाव घेत बस कंडक्टरला तात्काळ विलेपार्ले येथील कूपर रुग्णालयात दाखल केले. या अपघातामुळे अंधेरी पश्चिम भागात काही काळ भीतीचे वातावरण होते. आता सर्वांचे लक्ष कूपर रुग्णालयाकडून मिळणाऱ्या कंडक्टरच्या प्रकृतीविषयी अपडेट्सकडे आणि प्रशासनाच्या अंतिम तपास अहवालाकडे लागले आहे.
घटनास्थळी उपस्थित असलेल्या प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, समोरून येणाऱ्या एका बसने अचानक जोरात इमर्जन्सी ब्रेक मारला. हा ब्रेक इतका अनपेक्षित होता की, मागे असणाऱ्या इतर तीन बस चालकांना सावरण्याची संधीच मिळाली नाही. अवघ्या काही सेकंदांत एकामागोमाग एक अशा चारही बस एकमेकांवर आदळल्या.
Web Summary : Four BEST buses collided near Andheri's Azad Nagar metro station. A conductor was seriously injured and hospitalized. Police are investigating the cause of the accident, which involved a sudden emergency brake.
Web Summary : अंधेरी के आजाद नगर मेट्रो स्टेशन के पास चार बेस्ट बसें टकरा गईं। एक कंडक्टर गंभीर रूप से घायल हो गया और उसे अस्पताल में भर्ती कराया गया। पुलिस दुर्घटना के कारणों की जांच कर रही है, जिसमें अचानक इमरजेंसी ब्रेक शामिल था।