Join us

मुंबई : लोअर परळमधील नवरंग स्टुडिओत आग, अग्निशमन दलातील एक अधिकारी जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2018 11:39 IST

मुंबईत आग लागण्याचे सत्र गेल्या काही दिवसांपासून सुरूच आहेत. लोअर परळमधील नवरंग स्टुडिओत शुक्रवारी (19 जानेवारी) पहाटे भीषण आग लागली होती.

मुंबई -  मुंबईत आग लागण्याचे सत्र गेल्या काही दिवसांपासून सुरूच आहेत. लोअर परळमधील नवरंग स्टुडिओत शुक्रवारी (19 जानेवारी) पहाटे भीषण आग लागली होती. तीन तासांच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे. या घटनेत अग्निशमन दलातील 1 अधिकारी जखमी झाला आहे.

लोअर परळमध्ये नवरंग स्टुडिओ असून हा स्टु़डिओ गेल्या काही दिवसांपासून बंद आहे.  दरम्यान ही आग नेमकी कोणत्या कारणामुळे लागली याची माहिती अद्यापपर्यंत स्पष्ट झालेली नाही. मात्र लाकडी बांधकाम आणि वाऱ्यामुळे आग भडकल्याने स्टुडिओचा चौथा मजला जळून खाक झाला. ही आग विझवताना एक अग्निशमन जवान जखमी झाला आहे.  

 

 

 

टॅग्स :आग