सचिन लुंगासे, मुंबईमुंबई : पावसाळ्यात जुन्या इमारती कोसळून मनुष्यहानी होण्याची भीती असते. यावर खबरदारीचा उपाय म्हणून म्हाडाकडून मुंबई शहरातील इमारतींचे सर्वेक्षण करून धोकादायक व अतिधोकादायक इमारतींची यादी घोषित करण्यात आली आहे. त्यानुसार, म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळातर्फे मुंबई शहर बेटावरील जुन्या व मोडकळीस आलेल्या उपकरप्राप्त इमारतींचे नियमित पावसाळापूर्व सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले आहे. यावर्षी ९६ इमारती अतिधोकादायक आढळून आल्या आहेत. या इमारतींमध्ये मागील वर्षी अतिधोकादायक म्हणून घोषित केलेल्या २ इमारतींचा समावेश आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
अतिधोकादायक इमारतींमध्ये २५७७ निवासी व ५८५ अनिवासी असे एकूण ३१६२ रहिवासी आहेत. १८४ निवासी लोकांना घरे खाली करण्याकरिता नोटीस देण्यात आली आहे. नोटीस बजावलेल्या रहिवाशांपैकी ३ निवासी रहिवासी संक्रमण शिबिरामध्ये स्थलांतरित झाले आहेत. नोटीस देऊनही घरे खाली न केलेल्या निवासी गाळ्यांची संख्या १७६ आहे.
म्हाडातर्फे करण्यात आलेल्या कार्यवाहीनुसार एकाही रहिवाशाने स्वतःची निवार्याची पर्यायी व्यवस्था केली नाही. उर्वरित इमारतींमधील रहिवाशांना इमारत पाडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. घरे खाली करवून घेण्याची कारवाई सुरू आहे. तसेच २५७७ निवासी रहिवाशांची संक्रमण शिबिरात व्यवस्था करावी लागणार आहे. म्हाडातर्फे याबाबत कारवाई सुरू आहे.
म्हाडाचा नियंत्रण कक्ष
दूरध्वनी क्रमांक - २३५३६९४५, २३५१७४२३. भ्रमणध्वनी क्रमांक - ९३२१६३७६९९ महापालिकेचा नियंत्रण कक्ष : २२६९४७२५/२७
मुंबईतील ९६ अतिधोकादायक इमारती, बघा संपूर्ण यादी
१) ३० सी-३० डी , बोमनजी लेन २) १२०, बोरा बाजार स्ट्रीट ३) ९६-९६ अ, अली उमर स्ट्रीट ४) ५९-६१, निजाम स्ट्रीट ५) १५-२७, निजाम स्ट्रीट ६) २३, बोरा स्ट्रीट ७) इमारत क्रमांक ५९, दादी सेट अग्यारी लेन (सी-३९२१)८) इमारत क्रमांक ३५२-३५४, काळबादेवी रोड (सी-१८६८-६९)९) इमारत क्रमांक १२८-१३२, केव्हल स्ट्रीट (सी -३७३५)१०) इमारत क्रमांक ४०-४६, पिकेट रोड (सी-९१४)११) १८ के एम शर्मा मार्ग सी-२०८-२१५ व ९४३-४४/१२१२-१५१२) इमारत क्रमांक ४७-५७ सी.पी. टॅंक रोड १३) इमारत क्रमांक ५, दुसरी सुतार गल्ली १४) इमारत क्रमांक ८३-८५, ट्रिनिटी स्ट्रीट १५) ३१ ए, मामा परमानंद मार्ग, गिरगाव१६) १६-२२ एक, खत्तर अली लेन, गिरगाव१७) ११-१३, एम के रोड, गिरगाव१८) ५ डी, दुभाष लेन, गिरगाव१९) ३१६-एबी, ११, व्ही.पी. रोड, गिरगाव२०) २४७-बी, व्ही.पी. रोड, गिरगाव२१) १४४-१६८, कल्याण इमारत, गिरगाव२२) १३०-बी, खाडीलकर रोड, गिरगाव२३) १३० ए, खाडीलकर रोड, गिरगाव२४) ८८ डी-८८जी, खाडीलकर रोड, गिरगाव२५) ४१-४३-४५ जे एस एस रोड, गिरगाव२६) १४, (मंचाराम निवास), शेणवी वाडी, गिरगाव२७) १२, (विष्णू निवास), शेणवी वाडी, गिरगाव२८) २१-बीसी, खाडीलकर रोड, गिरगाव२९) २१३-२१५, डॉ. डी बी मार्ग राजा टेरेस (मागील वर्षीच्या यादीतील) ३०) १, खेतवाडी बारावी लेन, वाघेला कोपर (मागील वर्षीच्या यादीतील)३१) २४-२६-२८-३०, फकीर महल, खेतवाडी बँक रोड ३२) २२, मातृ वंदना, खेतवाडी सहावी लेन ३३) ९-११, कुपर भवन, खेतवाडी पाचवी लेन ३४) १-३, चंद्राभवन, खेतवाडी पाचवी लेन ३५) १२, फकरी मंझिल, शंकर शेठ लेन ३६) ११-१३-१५, पडोल बिल्डिंग, दोराबजी मिठाईवाला लेन३७) ५२ ई-५४, यूनियन बिल्डिंग, नौशिर भरूचा मार्ग ३८) ३५२ ए, एम.एस. अली रोड३९) १७१, फॉकलंड रोड व २८६, एम एस अली रोड ४०) ११४-ए, हकीम दयाल चाळ, फॉकलंड रोड४१) ११४-बी, हकीम दयाल चाळ, फॉकलंड रोड४२) ११४-११६, हकीम दयाल चाळ, फॉकलंड रोड४३) १९ बी, फितवाला चाळ जयराज भाई लेन ४४) १९ सी, हकीम दयाल चाळ,जयराज भाई लेन ४५) १६, न्यू हनुमान बिल्डिंग, शामराव विठ्ठल मार्ग ४६) २-८, पाव वाला स्ट्रीट ४७) २-८, न्यू हिरा बिल्डिंग, पारशी वाडा पहिली लेन ४८) १०-१२, हिरा बिल्डिंग, पारशी वाडा पहिली लेन ४९) ३८०-३८८, मॅजेस्टिक बिल्डिंग एसव्हीपी रोड ५०) ४३ डी-४३ ई, अरविंद निवास, चौपाटी सी फेस रोड५१) ३, राघवजी रोड, मुंबई ५२) १८, अमर निवास, बाणगंगा रोड,५३) इमारत क्रमांक १००डी न्यू स्टार मेन्शन, के.के. रोड ५४) कोळी चाळ नंबर ३-३ ए, गणपतराव कदम मार्ग ५५) ३८-४०-४० ए, लक्ष्मी बिल्डिंग, भाऊसाहेब तोडणकर मार्ग, एलफिस्टन रोड ५६) ३६-३६ ए, ३८-३८ ए, ४०-४२-४२ ए, हाजी नूरानी चाळ मार्ग, ज भा मार्ग ५७) १०० ई, मेहर लॉज, के.के. रोड सात रस्ता ५८) १६३-१६५, शर्मा निवास, न्यू प्रभादेवी रोड ५९) ४०५-४०९ डायमंड मेन्शन, गणपतराव कदम मार्ग६०) ३९४-३९४ बी-३९८-३९८ बी-४००-४०० बी सुरजी वल्लभदास चाळ६१) ३७३ ए साई प्रसाद, मुरारी घाग मार्ग६२) १४ फितवाला बिल्डिंग, एलफिस्टन रोड६३) ९८ हाजी कासम चाळ, शाहीर अमर शेख मार्ग६४) १४-१ एई, १६-१६ ई, खरास बिल्डिंग, ना म जोशी मार्ग६५) १२८-१३२, काझी सय्य्द स्ट्रिट६६) २६०-२६८, युसुफ मेहरअली रोड६७) १४, तांडेल स्ट्रिट६८) १५, तांडेल स्ट्रिट६९) १६२-१६४, निशानपाडा रोड७०) १००-१०२, कांबेकर स्ट्रिट७१) २५, ससेक्स रोड, माझगाव७२) ८६ बी, मापलावाडी मोतीशा लेन, माझगाव७३) ७-९ ए व १-९, हाथीबाग रोड७४) १०, हाथी बाग रोड७५) २२, नारळवाडी रोड, माझगाव७६) ५-१३, उनवाला बिल्डिग, डी. एन सिंग रोड, हाथी बाग रोड७७) २६, ससेक्स रोड माझगाव७८) २-२ डी, मोरलँड रोड / ११७, मोहम्म्द शाहिद मार्ग, किकाभाई बिल्डिंग७९) १५, डॉ. आनंदराव नायर रोड, हाजिमिया पटेल मंझिल८०) ६७०-६७२ ए, एन एम जोशी मार्ग, रहिमाबाई बिल्डिंग८१) ९४-१००, क्लेअर रोड / २५९, मौलाना आझाद रोड, आमिना मंझिल८२) ६८-७०, क्लेअर रोड, मसिना बिल्डिंग८३) ८-८ सी, २६-२६ एफ, कॉर्नर चेंबर्स, शिवाजी पार्क रोड नं. ५. दादर८४) ४३- ए, ४७ बी, ४७-४७ ए - ४९-५१, गारेगावकर वाडी, पोर्तुगीज चर्च रोड, दादर (प)८५) हेदवकर वाडी क्र.२. द. स. बाबरेकर मार्ग, गोखले रोड, (उ), दादर (प)८६) ९९९ ए, मातृस्मुती, एच एन पाटील मार्ग, दादर (प)८७) ३६, कुबल निवास, गोखले रोड, दादर (प)८८) प्लॉट क्र. २४-२६, बलडोटा हाऊस, लक्ष्मी नारायण लेन, माटुंगा (पू)८९) प्लॉट क्र. २११-ए, किती कुंज. देवधर रोड, माटुंगा (पू)९०) प्लॉट क्र. ९४, सिध्द निवास, हिंदू कॉलनी, रोड नं. ३, दादर (पू)९१) प्लॉट क्र.८६-८६ए, दस्तुर बंगलो, नायगाव क्रॉस रोड, दादर (पू)९२) धोकादायक इमारत क्र. १७ कृष्णा इमारत क्र. ३ उपकर क्र. फद-५७६ [१ ए], डॉ. बाटलीवाला रोड, परेल९३) धोकादायक इमारत क्र. १२६ चोक्शी मेन्शन उपकर क्र. फ द-५५९, डॉ. बी.ए. रोड, लालबाग९४) धोकादायक इमारत क्र. ३७ गुरुकृपा उपकर क्र. फ द-७५८ [१], डॉ. एस. एस. वाघ मार्ग, दादर९५) धोकादायक इमारत क्र २७४-२७४ ए मिनवां बिल्डींग, उपकर क्र.फ ८-८२५ [१ ए), माधवदास पास्ता रोड, दादर (पू) ९६) धोकादायक इमारत क्र.१८४-१८४ एफ मिनर्वा मेन्शन, उपकर क्र. फ द-८२५ [१], डॉ. बी. ए. रोड, दादर (पू)