Join us

Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2025 21:08 IST

मुंबई पोलिसांनी एका ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश केला. पोलिसांनी तब्बल १३ कोटींचे एमडी मादक पदार्थ जप्त केला असून, पाच जणांना अटक केली आहे. यात चार लोक मुंबईतील, तर एक जण मुंबईतील आहे.

Mumbai Drugs News: एका मोठ्या ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश करण्यात मुंबई पोलिसांना यश आले. मुंबई पोलिसांनी या प्रकरणात पाच जणांना अटक केली आहे. पोलिसांनी ड्रग्जही जप्त केले असून, त्याची बाजाराभावानुसार १३ कोटी किंमत आहे. या रॅकेटमध्ये आणखी कोण-कोण आहे, याचा शोध पोलीस घेत असून, आरोपींची चौकशी सुरू केली आहे. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

मुंबईमध्ये मार्च महिन्यात मुंबई पोलिसांनी एका आरोपीला ड्रग्जसह पकडले आणि अटक केली. त्याच्या ४.५ लाखांचे एमडी नावाचे ड्रग्ज सापडले होते. 

एका अधिकाऱ्याने सांगितले की, अटक केल्यानंतर आरोपीची चौकशी करण्यात आली. आरोपीने त्यांच्या सहकाऱ्यांची नावे चौकशीत उघड केली. त्याच माहितीच्या आधारे पोलिसांनी धाड टाकून पाच आरोपींना अटक केली. 

दक्षिण मुंबईत पोलिसांनी टाकली धाड

मुंबई पोलीस दलातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, झोन ६ च्या अँटी नार्कोटिक्स सेल, आरसीएफ पोलीस, दहशतवाद विरोधी पथक यांच्या संयुक्त विद्यमाने दक्षिण मुंबईतील एका ठिकाणी धाड टाकण्यात आली. तिथे ६.६ किलो एमडी या ड्रग्जचा साठा जप्त करण्यात आला. त्याची किंमत १३ कोटी रुपये आहे. 

आरोपींविरोधात एनडीपीएस कायद्यातील कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू करण्यात आला आहे. या रॅकेट मध्ये आणखी कोण आहेत, याचाही तपास पोलीस करत आहे. यापूर्वी फेब्रुवारीमध्ये नवी मुंबईमध्ये २०० कोटीचे ड्रग्ज जप्त करण्यात आले होते. 

टॅग्स :अमली पदार्थमुंबई पोलीसगुन्हेगारीनवी मुंबई