Join us

Mumbai: मालक नसलेल्या फ्लॅटचा १० लाखांत केला सौदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2023 13:42 IST

Mumbai: मालक नसतानाही फ्लॅट मालकीचा असल्याचे भासवत एका महिलेने दाम्पत्याकडून साडेदहा लाख रुपये घेऊन त्यांची फसवणूक केल्याची घटना दादरमध्ये घडली आहे.

मुंबई :  मालक नसतानाही फ्लॅट मालकीचा असल्याचे भासवत एका महिलेने दाम्पत्याकडून साडेदहा लाख रुपये घेऊन त्यांची फसवणूक केल्याची घटना दादरमध्ये घडली आहे. याप्रकरणी गुन्हा नोंदवत, दादर पोलिस अधिक तपास करत आहेत. येथील खेडगल्ली परिसरात राहत असलेल्या सविता (४५) या गृहिणी असून त्यांचे पती मुंबई महापालिकेत नोकरीला आहेत. दाम्पत्याने प्रभादेवी परिसरात घर घेण्याचे ठरवून घराचा शोध सुरू केला. सविता यांचे नातेवाईक राहण्यास असलेल्या इमारतीमधील रहिवासी छाया खरात यांचे घर विक्री करायचे असल्याची माहिती त्यांना समजली. सविता यांनी विचारणा केली असता खरात यांनीही घर विकायचे असल्याचे सांगितले.     नोव्हेंबर २०२० मध्ये सविता आणि त्यांच्या पतीने खरात यांची भेट घेऊन ३५ लाख रुपयांत घर खरेदी करण्याचा व्यवहार ठरवला. त्यानुसार, पैसेही दिले. पुढे तो त्यांच्या मालकीचाच नसल्याची धक्कादायक माहिती समोर येताच त्यांनी पोलिसांत धाव घेत तक्रार दिली.

टॅग्स :गुन्हेगारीधोकेबाजी