Join us  

Mumbai CST Bridge Collapse: तो पूल आमचाच, महापालिका अधिकाऱ्यांची कबुली

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2019 9:30 AM

कोसळलेला पूल कोणाचा यावरुन महापालिका आणि रेल्वे प्रशासनामध्ये टोलवाटोलवी करण्यात आली. मात्र या पुलाच्या देखभालीची जबाबदारी महापालिकेची असल्याचं पालिकेच्या अधिकाऱ्यांनी कबूल केलं आहे.

मुंबई - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील टाइम्स ऑफ इंडिया इमारतीला जोडणारा हिमालया पादचारी पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेत 6 जणांचा मृत्यू झाला. यानंतर हा पूल कोणाचा यावरुन महापालिका आणि रेल्वे प्रशासनामध्ये टोलवाटोलवी करण्यात आली. मात्र या पुलाच्या देखभालीची जबाबदारी महापालिकेची असल्याचं पालिकेच्या अधिकाऱ्यांनी कबूल केलं आहे. 

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जोडणारा टाइम्स ऑफ इंडिया इमारतीजवळील पादचारी पुलाची बांधणी आणि देखभाल-दुरुस्ती मुंबई महापालिकेकडून झाली होती. पालिका आणि रेल्वे प्रशासनाने पुलाची जबाबदारी घेण्याऐवजी दोन्ही प्रशासनांनी हात वर केले होते. सुरुवातीला पालिकेच्या स्थानिक नगरेसेविका सुजाता सानप म्हणाल्या होत्या की, "या पुलाची जबाबदारी रेल्वे प्रशासनाकडे होती". त्यावर रेल्वेने उत्तर दिले की, "हा पूल मुंबई महापालिकेच्या अखत्यारित आहे. मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनीही या पुलाची जबाबदारी रेल्वे प्रशासनाकडे होती असा दावा केला होता. मात्र महापालिका अधिकाऱ्यांनी दिलेल्या कबुलीनंतर कोसळलेला पूल हा मुंबई महापालिकेचा होता हे स्पष्ट झालं आहे. 

हा पूल बृहन्मुंबई महापालिकेच्या अखत्यारित आहे. एक वर्षापूर्वी या पुलाचे ऑडीट करुन आम्ही या पुलाची डागडुजी केली होती. एलिफिन्स्टन पुलाच्या दुर्घटनेनंतर सगळ्या पुलाचं ऑडिट झालं होतं मात्र, या पुलाचं ऑडिट झालेलं नव्हतं. याकडे दुर्लक्ष केल्यानेच ही दुर्घटना घडल्याचा आरोप केला जात आहे. 2018 डिसेंबर पासून या पुलाच्या किरकोळ दुरुस्तीचं टेंडर मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीत धुळखात पडून असल्याची माहिती आहे. तसेच हा पूल धोकादायक पुलांच्या यादीत नव्हता ही देखील माहिती समोर येतेय. 

मुंबई महापालिकेने गोखले पूल दुर्घटना नंतर 300 पेक्षा अधिक पूलाच ऑडिट केलं होतं , यावेळी हा पूल चांगला असून फक्त दुरुस्ती सुचवण्यात आल्या होत्या, मात्र गुरुवारी झालेल्या दुर्घटनेनंतर महापालिकेने केलेल्या ऑडिटवर ही प्रश्न चिन्ह उपस्थित झालं आहे. 

सीएसएमटी पादचारी पुलाची माहिती 1988 हा पूल बांधण्यात आला2016 साली या पुलाची किरकोळ दुरुस्ती, रंगरंगोटी झालीडिसेंबर 2018 मध्ये या पुलाच्या किरकोळ दुरुस्तीबाबतची निविदा काढण्यात आली ही निविदा आजही स्थायी समितीत मान्यतेअभावी पडून आहे.  

टॅग्स :सीएसएमटी पादचारी पूल दुर्घटनाछत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमुंबई महानगरपालिका