मुंबईतील पवई परिसरामधील एका हॉटेलमधून चालणाऱ्या सेक्स रॅकेटचा पोलिसांनी शुक्रवारी भांडाफोड केला असून, वेश्या व्यवसायासाठी आणलेल्या चार अभिनेत्रींची सुटका करण्यात आली आहे. तर एका दलालाला अटक करण्यात आली आहे. सुटका करण्यात आलेल्या चार मुली ह्या उदयोन्मुख अभिनेत्री आणि मॉडेल असल्याचे, तसेच त्यापैकी एकीने हिंदी मालिकेत काम केलं असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार या सेक्स रॅकेटची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी या सेक्स रॅकेटचा भांडाफोड करण्याच्या दृष्टीने पावलं उचलण्यास सुरुवात केली. खातरजमा करण्यासाठी पोलिसांनी एक तोतया ग्राहक उभा करून दलालांशी संपर्क साधला. तेव्हा दलालाने त्याच्याकडील काही अभिनेत्रींचे फोटो त्याला पाठवले. तसेच प्रत्येक मुलीसाठी ५० हजारांपासून ते एक लाख रुपयांपर्यंत किंमत मोजावी लागेल, असे सांगितले. या तोतया ग्राहकाने त्यास होकार दिल्यानंतर पवईमधील एका हॉटेलमध्ये या मुलींना पाठवण्याचे निश्चित झाले.
त्यानंतर पोलिसांनी सदर हॉटेलबाहेर सापळा रचला. तसेच हा दलाल पीडित मुलींना घेऊन आल्यानंतर धाड टाकून चार मुलींची सुटका केली. तसेच आरोपी दलालाला अटक केली. आरोपी दलालाचं नाव श्यामसुंदर अरोडा असं आहे. अटक केल्यानंतर त्याची कसून चौकशी केली जात आहेत.
दरम्यान, सुटका करण्यात आलेल्या मुली ह्या अभिनयाच्या क्षेत्रात आपली ओळख बनवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. तसेच त्यापैकी एकीने मालिकेमध्ये अभिनयसुद्धा केलेला आहे.