Mumbai Crime: नाशिकमधील धर्मांतरण आणि महिला कर्मचाऱ्यांच्या लैंगिक शोषणाचे प्रकरण ताजे असतानाच, आता मुंबईतही असाच एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका बड्या कन्स्ट्रक्शन कंपनीत काम करणाऱ्या १९ वर्षीय तरुणीला अश्लील व्हिडिओ पाठवून शरीरसुखाची मागणी करणाऱ्या अशरफ सिद्दीकी (वय २५) या तरुणाला आग्रीपाडा पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणामुळे आता मुंबईत कॉर्पोरेट लव्ह जिहादची चर्चा सुरू झाली असून राजकीय वातावरणही तापले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी महालक्ष्मी येथील एका नामांकित रिअल इस्टेट कंपनीत टेलीकॉलर म्हणून काम करत होती. त्याच ठिकाणी आरोपी अशरफ सिद्दीकी हा देखील काम करत होता. फेब्रुवारी महिन्यात त्या साईटचे काम बंद झाल्याने तरुणीने नोकरी सोडली. मात्र, अशरफने कंपनीच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमधून या तरुणीचा नंबर मिळवला आणि तिला त्रास देण्यास सुरुवात केली.
२१ एप्रिलपासून अशरफने तरुणीला सतत व्हॉट्सअॅप कॉल आणि मेसेज करून लव्ह फ्रेंडशिप करण्याची गळ घातली. इतकेच नव्हे तर, त्याने स्वतःचे नग्न फोटो आणि पॉर्न व्हिडिओ पाठवून तिला माझगाव येथील लॉजवर भेटायला येण्यासाठी दबाव टाकला.
'हिंदू मुलींना मुस्लिम मुले आवडतात'
तक्रारीनुसार, अशरफ केवळ एकाच तरुणीला नव्हे, तर कंपनीतील इतर ३-४ हिंदू मुलींनाही अशाच प्रकारे लक्ष्य करत होता. जेव्हा पीडितेने त्याला विरोध केला, तेव्हा आजकाल हिंदू मुलींना मुस्लिम मुलेच आवडतात, असे विधान त्याने केले. त्याने इतर मुलींचे फोटो पाठवून त्यांच्याशीही आपले शारीरिक संबंध असल्याचा खोटा दावा केला. मात्र, पीडितेने इतर मैत्रिणींकडे चौकशी केली असता, त्यांनाही हा तरुण अशाच प्रकारे त्रास देत असल्याचे समोर आले.
या त्रासाला कंटाळून पीडित तरुणीने अत्यंत हुशारीने अशरफचे कृत्य समोर आणलं. तिने शेजाऱ्याच्या मोबाईलचा वापर करून अशरफसोबतचे कॉल रेकॉर्डिंग केले, ज्यामुळे त्याचे सर्व कृत्य पुराव्यासह समोर आले. वडिलांना हा प्रकार सांगितल्यानंतर कुटुंबाने तात्काळ आग्रीपाडा पोलीस ठाण्यात धाव घेतली.
राजकीय पडसाद आणि गंभीर आरोप
या घटनेनंतर राजकीय पक्षांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. भाजपचे पदाधिकारी नितीन बनकर यांनी हा कॉर्पोरेट जिहादचा प्रकार असल्याचे म्हटले आहे. आरोपी हा एका राजकीय पक्षाच्या नगरसेवकाचा नातेवाईक असल्याचाही दावा केला जात आहे. माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी पोलीस ठाण्याला भेट देऊन पीडितेला धीर देत आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.
पोलीस कारवाई
आग्रीपाडा पोलिसांनी पीडितेच्या जबाबानुसार भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांखाली अशरफ सिद्दीकीविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. पोलीस आता या प्रकरणाचा सखोल तपास करत असून, त्याने अशा प्रकारे अजून किती मुलींना जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केला आहे, याचा शोध घेत आहेत.
Web Summary : Ashraf Siddiqui arrested for harassing a young woman with obscene content and pressuring her for a relationship. He targeted other Hindu women. Police are investigating further.
Web Summary : अशरफ सिद्दीकी को एक युवती को अश्लील सामग्री भेजने और संबंध बनाने के लिए दबाव डालने के आरोप में गिरफ्तार किया गया। उसने अन्य हिंदू महिलाओं को भी निशाना बनाया। पुलिस आगे जांच कर रही है।