Join us

पिचकाऱ्यांचे डाग आता सहज जाणार, विद्यार्थ्यांनी शोधलं नवं तंत्रज्ञान 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2018 09:16 IST

पिचकाऱ्यांचे डाग घालवणे सोपं नाही तसेच डाग स्वच्छ करण्यासाठी येणारा खर्चही अधिक असतो. मात्र माटुंगा येथील रुईया महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी आता पर्यावरणपूरक मार्गाने हे डाग स्वच्छ करण्याचा मार्ग शोधून काढला आहे. 

ठळक मुद्देरुईया महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी आता पर्यावरणपूरक मार्गाने हे डाग स्वच्छ करण्याचा नवा मार्ग शोधून काढला आहे. डॉ. मयुरी रेगे यांनी या समस्येवर जैविक संश्लेषणच्या आधारे पर्यावरणपूरक उपाय शोधण्याची संकल्पना मांडली.एमआयटी तर्फे घेण्यात आलेल्या जागतिक संशोधन स्पर्धेत रुईया महाविद्यालयाच्या प्रकल्पाने सुवर्ण पदक पटकाविले आहे.

मुंबई - रस्त्यावर चालताना पान खाऊन पिचकाऱ्या मारल्याचे असंख्य डाग दिसतात. बस स्टॉप, रेल्वे स्टेशन यासारख्या अनेक ठिकाणी पान खाऊन थुंकल्याने परिसर अस्वच्छ होतो. पिचकाऱ्यांचे डाग घालवणे सोपं नाही तसेच  हे डाग स्वच्छ करण्यासाठी येणारा खर्चही अधिक असतो. मात्र माटुंगा येथील रुईया महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी आता पर्यावरणपूरक मार्गाने हे डाग स्वच्छ करण्याचा नवा मार्ग शोधून काढला आहे. 

'स्वच्छ भारत अभियाना'पासून प्रेरणा घेऊन प्रकल्प साकारल्याची माहिती विद्यार्थ्यांनी दिली आहे. डॉ. मयुरी रेगे यांनी या समस्येवर जैविक संश्लेषणच्या आधारे पर्यावरणपूरक उपाय शोधण्याची संकल्पना मांडली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी या प्रकल्पावर काम करण्यास सुरुवात केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही रुईयाच्या युवा संशोधक विद्यार्थिनींची भेट घेऊन अभिनंदन केले आणि पुढच्या वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छाही दिल्या. 

एमआयटी विद्यापीठातर्फे दरवर्षी इंटरनॅशनल जेनेटिकली इंजिनीअर्ड मॅकेनिज या जागतिक संशोधन स्पर्धेचं आयोजन केले जाते. जगातील उच्च दर्जाचे काही संशोधन प्रकल्प या स्पर्धेसाठी निवडले जातात. त्यानुसार या स्पर्धेत जगभरातून तीनशेहून अधिक संघ सहभागी झाले होते. रुईयाच्या या प्रकल्पाला बेस्ट इंटिग्रेटेड ह्युमन प्रॅक्टिसेससाठीचे विशेष पारितोषिकही देण्यात आले.

अमेरिकेतील बोस्टनस्थित मॅसॅच्युसेटस् इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी (एमआयटी)तर्फे घेण्यात आलेल्या जागतिक संशोधन स्पर्धेत रुईया महाविद्यालयाच्या प्रकल्पाने सुवर्ण पदक पटकाविले आहे. ऐश्वर्या राजूरकर, अंजली वैद्य, कोमल परब, निष्ठा पांगे, मैथिली सावंत, मिताली पाटील, सानिका आंबरे आणि श्रृतिका सावंत यांचा समावेश आहे. रुईयाच्या या आठ विद्यार्थिनींना डॅा. अनुश्री लोकुर, डॅा. मयुरी रेगे, सचिन राजगोपालन आणि मुग्धा कुळकर्णी यांचे मार्गदर्शन लाभले. 

 

टॅग्स :मुंबईतंत्रज्ञानविद्यार्थी