मुंबईत पुन्हा थंडीची चाहूल; किमान तापमान १८.२ अंश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 04:06 AM2021-01-22T04:06:07+5:302021-01-22T04:06:07+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मुंबईचे गुरुवारचे किमान तापमान १८.२ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. परिणामी मुंबईकरांना पुन्हा एकदा ...

Mumbai is cold again; Minimum temperature 18.2 degrees | मुंबईत पुन्हा थंडीची चाहूल; किमान तापमान १८.२ अंश

मुंबईत पुन्हा थंडीची चाहूल; किमान तापमान १८.२ अंश

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मुंबईचे गुरुवारचे किमान तापमान १८.२ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. परिणामी मुंबईकरांना पुन्हा एकदा थंडीची चाहूल लागली आहे. मध्यंतरी निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे हवामानात बदल झाले होते. त्यामुळे मुंबई आणि राज्याच्या किमान आणि कमाल तापमानात वाढ नोंदविण्यात आली होती.

भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, उत्तर महाराष्ट्राच्या काही भागात मिनी विंटर अनुभवास येत आहे. येथे किमान तापमानात घट झाली आहे. जळगाव, पुणे, नाशिक, महाबळेश्वर, डहाणू, गोंदिया या शहरांच्या किमान तापमानात चांगली घसरण झाली आहे. आठवडाभर किमान तापमान खाली घसरण्याचा ट्रेंड कायम राहील, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.

२० जानेवारीपासून राज्यात पुन्हा एकदा थंडीची मध्यम लाट येईल, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तविली होती. त्यानुसार किमान तापमानात घट होत आहे. उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा, विदर्भ, उत्तर कोकणात थंडीचा प्रभाव राहील.

दरम्यान, मुंबईत गेले काही दिवस किमान आणि कमाल तापमानात वाढ झाली होती. सरासरी तापमान ४ अंशांनी वाढले होते. आकाश मोकळे होते. त्यामुळे मुंबईकरांना उन्हाच्या झळा बसत होत्या. दिवसासह रात्री किंचित उकाडा जाणवत होता. आता किमान तापमानात घट झाल्याने उकाडा कमी होईल, अशी शक्यता आहे.

* पुणे, नाशिकचा पारा जाणार १२ अंशांखाली

हवामान खात्याने गुरुवारी पुढील चार आठवड्यांचा अंदाज वर्तविला आहे. त्यानुसार, तिसऱ्या आणि चौथ्या आठवड्यात मध्य भारतात पाऊस पडण्याची शक्यता आहे. चौथ्या आठवड्यात पश्चिम भारतात हवामान सर्वसाधारण राहील. पुणे-नाशिक येथील पारा २२ आणि २३ जानेवारी नंतर १२ अंशांखाली जाईल. मुंबई आणि परिसराही किमान तापमानात आणखी घट होऊन ते १६ अंशांच्या आसपास नोंदविण्यात येईल.

........................

Web Title: Mumbai is cold again; Minimum temperature 18.2 degrees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.