Join us
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई सेंट्रल-दिल्ली विशेष सुपरफास्ट एसी ट्रेन; कसे असेल वेळापत्रक? जाणून घ्या सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2025 07:17 IST

होळी तसेच उन्हाळी हंगामात प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी या ट्रेन चालविण्यात येणार आहेत. 

मुंबई: पश्चिम रेल्वेने मुंबई सेंट्रल ते दिल्लीदरम्यान आठवड्यातून दोन सुपरफास्ट एसी स्पेशल ट्रेन चालविण्याचा निर्णय घेतला आहे. होळी तसेच उन्हाळी हंगामात प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी या गाड्या चालविण्यात येणार आहेत. 

मुंबई सेंट्रलवरून दर मंगळवारी आणि शुक्रवारी सकाळी १०:३० वाजता ही ट्रेन सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी १० वाजता दिल्लीला पोहोचेल. ही ट्रेन ७ ते २८ मार्चपर्यंत धावणार आहे.  दिल्ली-मुंबई सेंट्रल सुपरफास्ट स्पेशल दिल्लीहून दर बुधवारी आणि शनिवारी दुपारी १:०५ वाजता सुटेल. 

 

टॅग्स :पश्चिम रेल्वेभारतीय रेल्वेहोळी 2024