Join us
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईत व्यावसायिकाला त्याच्याच घरात कोंडलं, बेदम मारहाण अन् ५५ लाख लुटले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2023 18:19 IST

दक्षिण मुंबईच्या काळबादेवी परिसरात एका व्यावसायिकाला त्याच्याच  घरात घुसून चार अज्ञात व्यक्तींनी बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना

मुंबई-

दक्षिण मुंबईच्या काळबादेवी परिसरात एका व्यावसायिकाला त्याच्याच  घरात घुसून चार अज्ञात व्यक्तींनी बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या व्यावसायिकाला त्याच्याच घरात कोंडून चार जणांनी घरातील ५५ लाख रुपयांची रोकड तिजोरीतून लंपास केली आहे. संबंधित व्यावसायिकानं पोलीस ठाण्यात याबाबतची तक्रार दाखल केली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काळबादेवी परिसरातील आदित्य हाइट्स नावाच्या इमारतीत व्यावसायिक त्याच्या फ्लॅटमध्ये एकटाच राहत होता. चार अज्ञात व्यक्ती त्याच्या घरात घुसले आणि व्यावसायिकाला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. चोरट्यांनी व्यावसायिकाला कोंडून ठेवलं आणि घरातील तिजोरीतून ५५ लाख रुपयांची रोकड पळवली. पोलिसांना याची माहिती मिळताच संबंधित व्यावसायिकानं सांगितलेल्या घटनेनुसार तक्रारीची नोंद करण्यात आली आहे. तसंच पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे. 

एलटी मार्ग पोलिसांनी चार अज्ञातांविरोधात कलम ४५४, ३९२, ३४१ आणि ३४ अंतर्गत गुन्ह्याची नोंद केली आहे. इमारतीच्या सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून पोलीस तपासाला सुरुवात करण्यात आली आहे.

टॅग्स :मुंबईगुन्हेगारी