Join us

Mumbai: अनंत चतुर्थी पर्यंत भांडुप मधील बसमार्ग खंडित

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2023 20:34 IST

Mumabi News: गणेशोत्सव अवघा महिना भरावर आला असून ठीक ठिकाणी बाप्पाचे मंडप उभारण्याची लगबग सुरू झाली आहे. भांडुपमधील अरुंद रस्त्यांवर मंडप उभारण्यात येणार असल्याने बेस्ट उपक्रमाने प्रताप नगर पर्यंत ६०८ आणि ६१२ हे बसमार्ग खंडित करण्याचा निर्णय घेतला आहे.

- रतिंद्र नाईक मुंबई - गणेशोत्सव अवघा महिना भरावर आला असून ठीक ठिकाणी बाप्पाचे मंडप उभारण्याची लगबग सुरू झाली आहे. भांडुपमधील अरुंद रस्त्यांवर मंडप उभारण्यात येणार असल्याने बेस्ट उपक्रमाने प्रताप नगर पर्यंत ६०८ आणि ६१२ हे बसमार्ग खंडित करण्याचा निर्णय घेतला आहे. अनंत चतुर्थी पर्यंत हा मार्ग खंडित ठेवला जाणार आहे.

भांडुप मधील हनुमान नगर ते कांजुर मार्ग रेल्वे स्थानक दरम्यान धावणाऱ्या बस मार्ग क्रमांक ६०८ व भांडुप रेल्वे स्थानक ते हनुमान नगर दरम्यान धावणाऱ्या बस मार्ग क्रमांक ६१२ ही बस प्रताप नगर पर्यंत चालविण्यात येणार आहे. येथील रस्ते अरुंद असून या ठिकाणी सार्वजनिक मंडळांनी मंडप उभारण्याचे काम हाती घेतले आहे. हे बस मार्ग तुर्तास अनंत चतुर्थी पर्यंत खंडित करण्यात येणार आहे अशी माहिती बेस्ट उपक्रमाने दिली आहे.

टॅग्स :बेस्टमुंबई