Mumbai Building Collapse: मुंबई इमारत दुर्घटनेतील मृतांची नावं; दीड वर्षाच्या बालिकेसह ८ मुलांचा समावेश

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2021 09:45 AM2021-06-10T09:45:32+5:302021-06-10T10:06:11+5:30

Mumbai Building Collapse: मालाडमध्ये इमारत कोसळली; जखमींवर उपचार सुरू

Mumbai Building Collapse 11 dead 7 injured as residential building collapses in Malad West | Mumbai Building Collapse: मुंबई इमारत दुर्घटनेतील मृतांची नावं; दीड वर्षाच्या बालिकेसह ८ मुलांचा समावेश

Mumbai Building Collapse: मुंबई इमारत दुर्घटनेतील मृतांची नावं; दीड वर्षाच्या बालिकेसह ८ मुलांचा समावेश

Next

मुंबई: पश्चिम उपनगरातील मालाड पश्चिमेकडील मालवणी भागात एक चार मजली इमारत बुधवारी रात्री कोसळून झालेल्या दुर्घटनेत अकरा जणांचा मृत्यू झाला. तर सात जण जखमी झाले असून त्यांना बीडीबीए रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ज्यावेळी ही दुर्घटना घडली, त्यावेळी काही मुलांसह अनेक लोक या इमारतीमध्ये होते.

दुर्घटनेची माहिती मिळताच तातडीने अग्नीशमन दलाचे जवान आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर स्थानिक लोकांच्या मदतीने इमारतीच्या ढिगाऱ्याखली अडकलेल्या १५ हून अधिक लोकांना बाहेर काढण्यात आले. तसेच, इमारतही खबरदारी म्हणून रिकामी करण्याचा निर्णय घेण्यात आला. येथील रहिवाशांना तातडीने अन्यत्र हलवण्यात येत असून युद्धपातळीवर मदत व बचावकार्य सुरू आहे.

मालाडमधील मालवणी गेट क्र. ८ येथे अब्दुल हमीद मार्गावर न्यू कलेक्टर कंपाऊंड परिसरात बुधवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास ही दुर्घटना घडली. इमारत अचानक कोसळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. या दुर्घटनेत अकरा जणांचा मृत्यू झाला. तर सात जण  जखमी झाले असून त्यांना बीडीबीए रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोहचलेल्या अग्निशमन दलाच्या जवानांकडून युद्धपातळीवर मदतकार्य सुरू करण्यात आले.

दुर्घटनेतील मृतांची नावं-
१. साहिल सरफराज सय्यद (९ वर्षे)
२. आरिफा शेख (९ वर्षे)
३. शफिक मोहम्मद सलीम सिद्दीकी (४५ वर्षे)
४. तौसिफ शफिक सिद्दीकी (१५ वर्षे)
५. एलिशा शफिक सिद्दीकी (१० वर्षे)
६. अल्फिसा शफिक सिद्दीकी (दीड वर्षे)
७. अफिना शफिक सिद्दीकी (६ वर्षे)
८. इशरत बानो शफिक सिद्दीकी (४० वर्षे)
९. रहिसा बानो रफिक सिद्दीकी (४० वर्षे)
१०. तहेस सफिक सिद्दीकी (१२ वर्षे)
११. जॉन इरान्ना (१३ वर्षे)

दुर्घटनेतील जखमींची नावं-
१. मरीकुमारी हिरांगणा (३० वर्षे) प्रकृती गंभीर
२. धनलक्ष्मी बेबी (३६ वर्षे) प्रकृती स्थिर
३. सलीम शेख (४९ वर्षे) प्रकृती स्थिर
४. रिझवान सय्यद (३३ वर्षे) प्रकृती स्थिर
५. सूर्यमणी यादव (३९ वर्षे) प्रकृती स्थिर
६. करीम खान (३० वर्षे) प्रकृती स्थिर
७. गुलझार अहमद अन्सारी (२६ वर्षे) प्रकृती स्थिर
 

Web Title: Mumbai Building Collapse 11 dead 7 injured as residential building collapses in Malad West

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.