Join us

Mumbai: गोरेगावात भाजपाची पोलखोल अभियान सभा  

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2022 16:15 IST

Mumbai: महाविकास आघाडी सरकारच्या वसुलीखोरीची व गेल्या 25 वर्षात मुंबई महानगर पालिकेत झालेल्या भ्रष्टाचाराची पोलखोल करण्यासाठी गोरेगाव येथे आयोजन करण्यात आले आहे.

मुंबई - महाविकास आघाडी सरकारच्या वसुलीखोरीची व गेल्या 25 वर्षात मुंबई महानगर पालिकेत झालेल्या भ्रष्टाचाराची पोलखोल करण्यासाठी गोरेगाव विधानसभेत वॉर्ड क्रमांक ५८ (पत्रा चाळ असलेला वॉर्ड) मध्ये  उद्या रविवार दि,१७ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता सिद्धार्थ नगर रस्ता क्रमांक ११,प्रबोधन क्रीडा भवनाजवळ,तातू हॉटेलच्या बाजूला, गोरेगाव (प) येथे पोलखोल सभेचे आयोजन केले आहे.

या सभेला मुंबई भाजपचे अध्यक्ष, आमदार मंगलप्रभात लोढा,महापालिका निवडणूक समितीचे अध्यक्ष आमदार अँड.आशिष शेलार,विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर,मुंबई भारतीय जनता पार्टीचे प्रभारी व आमदार अतुल भातखळकर, खासदार गोपाळ शेट्टी, खासदार पूनम महाजन, खासदार मनोज कोटक, आमदार अमित साटम,स्थानिक आमदार विद्या ठाकूर व मुंबईतील भारतीय जनता पार्टीचे सर्व आमदार यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. निमंत्रक उत्तर पश्चिम जिल्ह्याअध्यक्ष  संतोष मेढेकर व माजी नगरसेवक संदीप पटेल यांनी ही माहिती दिली.

टॅग्स :भाजपामुंबई