Join us  

Mumbai Bandh: 'मुख्यमंत्र्यांकडून मराठा समाजाची बदनामी आणि फसवणुकीचा प्रयत्न' 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2018 5:02 PM

Mumbai Bandh सरकारकडून मराठा समाजाची बदनामी आणि फसवणूक केली जातेय.

मुंबई- मराठा समाजाचं आंदोलन स्थगित करण्यात आलं असलं तरी महाराष्ट्रातून त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार अशोक चव्हाण यांनीही मराठा समाजाच्या मोर्चाला पाठिंबा दिला आहे. ते म्हणाले, मुख्यमंत्र्यांचा फक्त दिखावा आहे, ते काहीच करत नाही. सरकारकडून मराठा समाजाची बदनामी आणि फसवणूक केली जातेय.देवेंद्र फडणवीस सरकारकडून कोर्टातली सुनावणी टाळण्याचा प्रयत्न सुरू आहे. मुख्यमंत्री मराठा समाजाची बदनामी करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही अशोक चव्हाणांनी केला आहे. आधीच दखल घेतली असती तर हकनाक जीव गेले नसते. जातीजातींमध्ये संघर्ष पेटवून मराठा समजाला एकटं पाडण्याचा प्रयत्न सुरू आहे. मराठा विरुद्ध दलित असा वाद निर्माण केला जातोय. शाहू, फुले आंबेडकरांचा महाराष्ट्रासाठी वाचवण्यासाठी सर्व समाजानं एकत्र येणं गरजेचं आहे.तोडगा काढायचा सोडून सरकारचा वेळकाढूपणा सुरू आहे, महाराष्ट्रामध्ये हिंसाचार वाढू नये, हा विषय कालबद्ध पद्धतीनं सोडवला गेला पाहिजे. सरकारनं लोकांचा अंत पाहू नये, मुख्यमंत्र्यांनी जनतेची माफी मागावी, मराठ्यांच्या आंदोलनाला मुख्यमंत्री जबाबदार आहेत. मुख्यमंत्र्यांनी एक दिवसाचं विशेष अधिवेशन बोलवावं, अशी मागणी अशोक चव्हाणांनी केली आहे. आता चर्चा नको, कृती हवी, असंही अशोक चव्हाण म्हणाले आहेत. 

टॅग्स :मुंबई बंदमहाराष्ट्र बंददेवेंद्र फडणवीसअशोक चव्हाण