Join us

मुंबईत प्रॉपर्टीच्या वादातून एकाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2017 13:26 IST

मुंबईत प्रॉपर्टीच्या वादातून एका व्यक्तीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. 

मुंबई- मुंबईत प्रॉपर्टीच्या वादातून एका व्यक्तीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला.  सुनील भिवा कातेले (३०) नामक व्यक्तीला जिवंत जळण्याचा प्रयत्न करण्यात आला. हा प्रकार गोरेगावच्या बांगुर नगर परिसरात आदिवासी पाडामध्ये बुधवारी सकाळी घडला. कातेले हे पायाने अधू आहेत. त्यामुळे त्यांना खोलीत बंद करुन हा प्रकार करण्यात आला. ज्यात ते गंभीर जखमी झाले असून त्यांना नायर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी त्यांच्या एका नातेवाईकाला गोरेगाव पोलिसांनी अटक केली असून अधीक चौकशी सुरु आहे. 

सुनील कातेले ९५% भाजल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे. याप्रकरणी संतोष लाडक्या कातेले (४०) याला पोलिसांनी अटक केली आहे. 

टॅग्स :गुन्हे