मालवाहतुकीत मुंबई विमानतळाचा नवा विक्रम; कोरोनाकाळात ७.७ लाख टन मालाची ने-आण

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2022 09:57 AM2022-02-12T09:57:11+5:302022-02-12T09:57:37+5:30

वर्षभरात माल वाहतुकीसाठी १ लाख ८ हजार विमानांची मदत घेतली.

Mumbai Airport's new record in freight; 7.7 lakh tons of cargo during the Corona period | मालवाहतुकीत मुंबई विमानतळाचा नवा विक्रम; कोरोनाकाळात ७.७ लाख टन मालाची ने-आण

मालवाहतुकीत मुंबई विमानतळाचा नवा विक्रम; कोरोनाकाळात ७.७ लाख टन मालाची ने-आण

Next

मुंबई : कोरोनाकाळात जागतिक पुरवठा साखळी विस्कळीत झाली असतानाही मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाने कामगिरीचा आलेख कायम ठेवला आहे. गेल्या वर्षभरात तब्बल ७.७ लाख टन मालाची हाताळणी करून विमानतळाने नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. २०२० च्या तुलनेत २०२१ मध्ये मालवाहतुकीत २८ टक्क्यांची वाढ नोंदविली. मुंबई विमानतळ प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, २०२१ मध्ये मुंबई विमानतळावरून एकूण ७.७ लाख टन मालवाहतूक केली. त्यापैकी २.१ लाख टन देशभरात, तर ५.६ लाख टन माल परदेशात पोहोचविण्यात आला. २०२० च्या तुलनेत देशांतर्गत मार्गावर ३० टक्के, तर आंतरराष्ट्रीय मार्गावरील मालवाहतुकीत २७ टक्के वाढ झाली आहे.

वर्षभरात माल वाहतुकीसाठी १ लाख ८ हजार विमानांची मदत घेतली. २०२० च्या तुलनेत ही संख्या ३१ टक्क्यांनी अधिक आहे. देशांतर्गत मार्गांवर वैद्यकीय नमुने, ई-कॉमर्सची सर्वाधिक हाताळणी झाली. 

 वैद्यकीय सामग्री किती हाताळली?

कोविड लसी      ३११ मिलियन
ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर      १०००
कोरोनावरील औषधे       ६०० टन
ऑक्सिजन जनरेटर      ५० टन

येथील निर्यातीत वाढ
फ्रँकफर्ट 
शांघाय 
हाँगकाँग 
रिओ डी 
जनेरियो 
ओमाहा

सर्वाधिक आयात येथून 
दुबई 
फ्रँकफर्ट
लंडन
काटोविस 
फुझो

Web Title: Mumbai Airport's new record in freight; 7.7 lakh tons of cargo during the Corona period

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.