मुंबई विमानतळ कर्मचाऱ्यांच्या तत्परतेने वाचले हृदयविकाराचा झटका आलेल्या नागरिकाचे प्राण

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2019 03:45 AM2019-11-23T03:45:27+5:302019-11-23T03:47:44+5:30

तत्काळ वैद्यकीय मदत उपलब्ध झाल्याने जीव वाचला

Mumbai airport workers readily die of heart attack | मुंबई विमानतळ कर्मचाऱ्यांच्या तत्परतेने वाचले हृदयविकाराचा झटका आलेल्या नागरिकाचे प्राण

मुंबई विमानतळ कर्मचाऱ्यांच्या तत्परतेने वाचले हृदयविकाराचा झटका आलेल्या नागरिकाचे प्राण

Next

मुंबई : मुंबई विमानतळाच्या टर्मिनल २ वर हृदयविकाराचा झटका आलेल्या एका ६२ वर्षीय प्रवाशाला तत्काळ वैद्यकीय मदत उपलब्ध झाल्याने त्याचा जीव वाचविण्यात यश आले आहे.

गुुरुवारी पत्नीचे विमानतळावर स्वागत करण्यासाठी सदर इसम त्यांच्या मुलीसमवेत आले होते. दरम्यान, श्वास घेण्यास त्रास होत असल्याची तक्रार सदर इसमाने केल्यावर विमानतळावरील तत्काळ वैद्यकीय मदत देणाºया पथकाने त्यांची तपासणी केली व त्यांच्यावर प्राथमिक उपचार केले. त्यांना मधुमेह, उच्च रक्तदाब असे विविध विकार असल्याने अधिक उपचारांसाठी विमानतळाच्या रुग्णवाहिकेतून रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर वेळीच उपचार करण्यात आल्याने ते आता धोक्यातून बाहेर आल्याचे सांगण्यात आले.

Web Title: Mumbai airport workers readily die of heart attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.