Mumbai Airport: मुंबई विमानतळ २० नोव्हेंबर रोजी ६ तास बंद राहणार, कारण काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2025 10:34 IST2025-11-19T10:33:09+5:302025-11-19T10:34:45+5:30
mumbai airport runway update : मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील दोन्ही धावपट्ट्या उद्या २० नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत बंद राहणार

Mumbai Airport: मुंबई विमानतळ २० नोव्हेंबर रोजी ६ तास बंद राहणार, कारण काय?
मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील दोन्ही धावपट्ट्या उद्या २० नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत बंद राहणार आहेत. धावपट्टीशी निगडीत दुरुस्तीच्या कारणास्तव उद्या ६ तास कोणत्याही विमानाचे उड्डाण होणार नाही.
पावसाळ्यानंतर विमानतळावरील धावपट्ट्यांची दुरुस्ती करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. या कालावधीत उड्डाण वेळापत्रक आणि कर्मचाऱ्यांची योग्य व्यवस्था करण्यासाठी विमानतळ व्यवस्थापनाने ६ महिन्यांपूर्वीच याची कल्पना सर्व विमान वाहतूक कंपन्यांना दिली होती. जेणेकरुन प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागणार नाही.
"मुंबई विमानतळ हवाई सुरक्षितता आणि सुरक्षेशी निगडीत सर्वोच्च दर्जा राखते. पावसाळ्यानंतरच्या वार्षिक दुरुस्ती योजनेचा भाग म्हणून दोन्ही क्रॉस रनवे २० नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत तात्पुरते बंद राहतील", असे एका अधिकाऱ्याने सांगितले आहे.
धावपट्टीच्या दुरुस्तीमध्ये तपशीलवार तपासणी, धावपट्टीवरील लाइट्स, मार्किंग आणि ड्रेनेश सिस्टीमचे तांत्रिक मूल्यांकन यांचा समावेश असणार आहे.