मुंबई विमानतळाचा देशांतर्गत, आंंतरराष्ट्रीय प्रवाशांंत घट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2020 05:08 IST2020-01-11T05:08:06+5:302020-01-11T05:08:11+5:30

२०१८च्या तुलनेत २०१९ या वर्षांत जानेवारी ते नोव्हेंबर या अकरा महिन्यांच्या कालावधीत मुंबई विमानतळावरील देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय प्रवाशांच्या संख्येत घट झाली आहे.

Mumbai airport declines in domestic, international passengers | मुंबई विमानतळाचा देशांतर्गत, आंंतरराष्ट्रीय प्रवाशांंत घट

मुंबई विमानतळाचा देशांतर्गत, आंंतरराष्ट्रीय प्रवाशांंत घट

मुंबई : २०१८च्या तुलनेत २०१९ या वर्षांत जानेवारी ते नोव्हेंबर या अकरा महिन्यांच्या कालावधीत मुंबई विमानतळावरील देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय प्रवाशांच्या संख्येत घट झाली आहे. देशाच्या हवाई प्रवाशांच्या संख्येत वाढ होत असताना, देशातील दुसऱ्या क्रमांकाच्या व्यस्त विमानतळावरील प्रवाशांच्या संख्येत घट झाली आहे.
२०१९ मध्ये मुंबई विमानतळावरून ३.३८ कोटी प्रवाशांनी देशांतर्गत प्रवास केला. २०१८ मध्ये हे प्रमाण ३.५ कोटी होते. गतवर्षीच्या तुलनेत यात ३.४ टक्क्यांनी घट झाली आहे. मुंबई विमानतळावरून २०१९ मध्ये आंतरराष्ट्रीय प्रवास करणाºया प्रवाशांची संख्या १.३ कोटी होती. २०१८ मध्ये हे प्रमाण १.४ कोटी होते. यात ७ टक्के घट झाली आहे.
देशभरात १३.१ कोटी देशांतर्गत प्रवाशांनी प्रवास केला, तर २०१८ मध्ये ही संख्या १२.६ कोटी होती. यामध्ये ४ टक्क्यांची वाढ झाली आहे. भारतातील हवाई वाहतूक क्षेत्रात सातत्याने होत असलेल्या बदलांच्या पार्श्वभूमीवर प्रवासी संख्या घटल्याचे समोर आले आहे. गो एअर व इंडिगोच्या ताफ्यातील प्रॅट अँड व्हिटनी प्रकारच्या इंजिनामधील तांत्रिक बिघाडामुळे अनेक उड्डाणे रद्द करण्यात आली होती. काही विमानांना बदल करेपर्यंत उड्डाणांपासून रोखण्यात आले होते. एप्रिल, २०१९ मध्ये जेट एअरवेज बंद पडल्याने, त्याचा मोठा फटका देशातील हवाई वाहतुकीला बसला आहे. त्याशिवाय भारत व पाकिस्तानमधील तणावामुळे पाकिस्तानी हवाई हद्द भारतीय विमानांना वापरण्यास १३८ दिवस बंद करण्यात आल्याने मुंबईमधून उड्डाण होणारी काही विमाने रद्द करण्यात आली होती. परिणामी, हवाई प्रवाशांच्या संख्येत घट झाल्याची माहिती या क्षेत्रातील जाणकारांनी दिली.
इंटरनॅशनल एअर ट्रान्सपोर्ट असोसिएशन (आयएटीए)ने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, जागतिक पातळीवरील हवाई मालवाहतुकीत (एअर कार्गो) घट झाली आहे. फ्रेट टन किलोमीटरमध्ये नोव्हेंबर, २०१८च्या तुलनेत नोव्हेंबर, २०१९ मध्ये १.१ टक्क्यांची घट झाली आहे. आॅक्टोबर महिन्यात हे प्रमाण ३.४ टक्क्यांनी घटले होते.

Web Title: Mumbai airport declines in domestic, international passengers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.