अहमदाबाद बुलेट ट्रेनमुळे सकल राष्ट्रीय उत्पन्नात वाढ होणार- फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2018 09:35 PM2018-03-23T21:35:06+5:302018-03-23T21:35:06+5:30

जिथे जिथे फास्ट ट्रेन गेली आहे तेथील विकासदरात वाढ झाली आहे.

Mumbai ahmedabad Bullet train increases GDP of country says Devendra Fadnavis | अहमदाबाद बुलेट ट्रेनमुळे सकल राष्ट्रीय उत्पन्नात वाढ होणार- फडणवीस

अहमदाबाद बुलेट ट्रेनमुळे सकल राष्ट्रीय उत्पन्नात वाढ होणार- फडणवीस

Next

मुंबई, दि. 23 :  ज्या ज्या देशात बुलेट ट्रेनचे प्रकल्प झाले आहेत तेथील सकल राष्ट्रीय उत्पन्नात (जीडीपी) वाढ झाली आहे. प्रस्तावित मुंबई- अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या माध्यमातून सकल राष्ट्रीय उत्पन्नात (जीडीपी) वाढ होणार असून हा प्रकल्प राज्याला प्रगतीपथावर नेणारा असल्याचे मुखमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान परिषदेत लक्षवेधीला उत्तर देताना सांगितले.

सदस्य संजय दत्त यांनी मुंबई अहमदाबाद या प्रस्तावित बुलेट ट्रेन विषयीची लक्षवेधी उपस्थित केली होती. यावर उत्तर देताना मुख्यमंत्री बोलत होते.  दळणवळण व्यवस्था (मोबिलीटी) हा विकासाचा मार्ग आहे. जिथे जिथे फास्ट ट्रेन गेली आहे तेथील विकासदरात वाढ झाली आहे. याच दृष्टीने मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनचा प्रकल्प प्रस्तावित आहे. या प्रकल्पासाठी जपान सरकार कर्ज देणार आहे. 50 वर्षांसाठी जपान सरकारने अर्ध्या टक्कापेक्षा कमी दराने बुलेट ट्रेनसाठी कर्ज दिले आहे. सुरुवातीची 20 वर्षे कुठलीही व्याज द्यावे लागणार नाही. भविष्यात मुंबई- पुणे व राज्यातील इतर ठिकाणीही बुलेट ट्रेन सुरू करण्याचा विचार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

मुंबईतल्या लोकलसाठी पाहिल्यादाच अर्थसंकल्पात 40हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. मुंबईतील प्रवाशांच्या सुरक्षा, उपाययोजना यासाठी हे पैसे देण्यात आले आहेत. बुलेट ट्रेनचे तिकीट हे रेल्वे तिकीटाएवढेच राहणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.  मुंबईत आर्थिक केंद्र होणार आहे. नैसर्गिकदृष्टया मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे. त्यामुळे मुंबईत आर्थिक केंद्र होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री  राहुल नार्वेकर, भाई जगताप यांनी भाग घेतला होता.
 

Web Title: Mumbai ahmedabad Bullet train increases GDP of country says Devendra Fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.