Join us
Daily Top 2Weekly Top 5

Mumbai: आरटीईच्या सहा हजार विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2023 08:13 IST

Mumbai: आरटीई प्रवेशासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांची सोडत जाहीर झाली आहे. मुंबईत ६ हजार ३४६ विद्यार्थ्यांना प्रवेश निश्चित झाले आहेत.

 मुंबई : आरटीई प्रवेशासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांची सोडत जाहीर झाली आहे. मुंबईत ६ हजार ३४६ विद्यार्थ्यांना प्रवेश निश्चित झाले आहेत. प्रवेश मिळालेल्या मुलांच्या पालकांनी २५ एप्रिलपर्यंत स्थानिक स्तरावर म्हणजेच महानगरपालिका स्तरावरील पडताळणी समितीकडे जाऊन कागदपत्रे तपासून प्रवेश निश्चित करावा लागणार आहे.शाळेत प्रवेश घेण्यासाठी ३० एप्रिलपर्यंतची मुदत आहे. मुंबईत असलेल्या ३३७ खासगी शाळांमध्ये उपलब्ध असलेल्या ६ हजार ५६९ जागांसाठी तब्बल १८ हजार २२६ अर्ज आले होते. पडताळणी झाल्यानंतर ५ एप्रिल रोजी आरटीई प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन सोडत प्रक्रिया काढण्यात आली, प्रवेश मिळालेल्या बालकांच्या पालकांनी २५ एप्रिलपर्यंत कागदपत्रे तपासून प्रवेश निश्चित करावा लागणार आहे.

टॅग्स :शिक्षण हक्क कायदामुंबई