Mumbai Suicide: मुंबईतील प्रसिद्ध मॉलच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी, ३८ वर्षीय व्यक्तीच्या मृत्युने परिसरात खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2025 14:20 IST2025-06-03T14:19:49+5:302025-06-03T14:20:49+5:30

Mumbai R City Mall Suicide News: मुंबईतील घाटकोपर पूर्व येथील एका मॉलच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून एका व्यक्तीने आत्महत्या केली.

Mumbai: 38-Year-Old Man Dies By Suicide at famous Mall | Mumbai Suicide: मुंबईतील प्रसिद्ध मॉलच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी, ३८ वर्षीय व्यक्तीच्या मृत्युने परिसरात खळबळ

Mumbai Suicide: मुंबईतील प्रसिद्ध मॉलच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी, ३८ वर्षीय व्यक्तीच्या मृत्युने परिसरात खळबळ

मुंबईतील घाटकोपर पूर्व येथील मॉलच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून एका व्यक्तीने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. आत्महत्येचे कारण अस्पष्ट असून संबंधित व्यक्ती गेल्या काही काळापासून मानसिक तणावात होता, अशी माहिती पोलीस तपासात उघड झाली. याप्रकरणी पोलिसांनी आत्महत्येची नोंद करून पुढील तपसाला सुरुवात केली आहे. ही घटना सोमवारी (०२ जून २०२५) दुपारच्या सुमारास घडली.

दीपक जोशी (वय, ३८) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारी दीपक मॉलमध्ये गेला. त्यानंतर काही वेळ फिरल्यानंतर तो मॉलच्या तिसऱ्या मजल्यावर गेला आणि तिथून उडी मारली. या घटनेची माहिती मिळताच पार्कसाइट पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन दीपकला तात्काळ जवळच्या रुग्णालयात नेले. परंतु, तिथे डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले.

दीपकने आत्महत्या का केली? याचे कारण अद्याप समजू शकले नाही. परंतु,गेल्या काही काळापासून तो मानसिक तणावात होता, अशी माहिती पोलिसांना मिळाली. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत. मात्र, या घटनेने मॉलमध्ये उपस्थित असलेले खरेदीदार आणि कर्मचारी यांच्यात एकच खळबळ उडाली.

Web Title: Mumbai: 38-Year-Old Man Dies By Suicide at famous Mall