mukrdh ambani support congress contestant in south mumbai, milind devra | मुकेश अंबानींचा काँग्रेस उमेदवारासाठी प्रचार, मित्राच्या मुलाचं केलं गुणगान
मुकेश अंबानींचा काँग्रेस उमेदवारासाठी प्रचार, मित्राच्या मुलाचं केलं गुणगान

मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदींचे खास आणि देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या मुकेश अंबानी यांनी यंदा चक्क काँग्रेस उमेदवाराला आपला जाहीर पाठिंबा दिला आहे. विशेष म्हणजे या उमेदवारासाठी ते प्रचारातही सक्रीय झाले आहेत. दक्षिण मुंबईलोकसभा मतदारसंघासाठी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष मिलिंद देवरा यांना पाठिंबा दिला आहे. याबाबत मिलिंद देवरा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. 

अंबानी यांनी मिलिंद देवरा दक्षिण मुंबईसाठी योग्य उमेदवार असल्याचे म्हटले आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्यावतीने दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून देवरा लोकसभा निवडणूक लढवत आहेत. त्यांना भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार आणि विद्यमान खासदार अरविंद सावंत यांचे प्रमुख आव्हान आहे. ‘मिलिंद देवरा दक्षिण मुंबईसाठीचे योग्य उमेदवार आहेत. त्यांनी दक्षिण मुंबईचे 10 वर्षे प्रतिनिधित्व केले आहे. मिलिंद यांना सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक व्यवस्थेचे सखोल ज्ञान आहे.’ त्यामुळे त्यांना निवडूण द्या, असे अंबानी यांनी व्हीडिओत म्हटले आहे. गेल्या 2014 च्या निवडणुकीत अंबानी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना जाहीरपणे पाठिंबा दर्शवला होता. तर, यंदा देवरा यांच्या भरोसा दाखवला आहे. 

दक्षिण मुंबई म्हणजे व्यापार, त्यामुळेच अगदी लहानात लहान दुकानदारापासून ते मोठ्या इंडस्ट्रीयलीस्टपर्यंत इथं व्यापार आहे. येथील सर्वच व्यापाऱ्यांना समृद्ध करायचं असून येथे मोठ्या प्रमाणात रोजगारही उपलब्ध करायचा असल्याचे मिलिंद देवरा यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. या ट्विटमधील व्हीडिओत छोट्या दुकानदारांपासून ते अंबानींपर्यंत सर्वांच्याच प्रतिक्रिया असून त्यांनी देवरांना मतदान करण्याचे आवाहन केलं आहे. दरम्यान, दक्षिण मुंबई मतदारसंघात 29 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. यादिवशी राज्यातील एकूण 17 मतदारसंघात मतदान होत आहे.  


Web Title: mukrdh ambani support congress contestant in south mumbai, milind devra
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.