Join us  

वाझे अडकले, पुरावे सापडले; आता 'ती' फाईल अमित शहांकडे, ठाकरे सरकारला आणखी एक धक्का?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2021 3:32 PM

mansukh hiren case: ठाकरे सरकारच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता

मुंबई/नवी दिल्ली: उद्योगपती मुकेश अंबानींच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेल्या स्थितीत आढळलेल्या कारचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून (एनआयए) सुरू आहे. याआधी मुंबई पोलीस दलाच्या सीआययूचे प्रमुख आणि एपीआय सचिन वाझे या प्रकरणाचा तपास करत होते. मात्र वाझे यांची भूमिका संशयास्पद आढळून आल्यानं एनआयएनं या प्रकरणाचा तपास हाती घेतला. त्यानंतर वाझे यांना अटक करण्यात आली. त्यांना २५ मार्चपर्यंतची कोठडी सुनावण्यात आली आहे. (nia likely to take over investigation of mansukh hiren case)हिरेन यांचा मृत्यू नेमका कशामुळे? डायटम बोन रिपोर्टमधून महत्त्वाची माहिती समोरअंबानींच्या घराबाहेर आढळून आलेल्या स्फोटकांनी भरलेल्या कारचा तपास सचिन वाझे करत होते. त्यांच्यावर विरोधकांनी आरोप करताचा खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी वाझेंची पाठराखण केली. मात्र एनआयएनं तपास हाती घेत थेट वाझेंनाच अटक केली. एनआयएनं या प्रकरणाचा तपास हाती घेतल्यानं ठाकरे सरकारला धक्का बसला. यानंतर आता महाविकास आघाडी सरकारला आणखी एक धक्का बसण्याची शक्यता आहे.ठाकरे सरकारच्या वाझे गँगने मनसुख हिरेन यांची हत्या केली ; किरीट सोमय्या यांचा ठाकरे सरकारवर आरोपअंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर आढळून आलेल्या कारचा तपास हाती घेणाऱ्या एनआयएनं मनसुख हिरेन प्रकरणाचा तपासदेखील स्वत:कडे घेण्याची तयारी सुरू केली आहे. यासाठी आवश्यक परवानग्या गृह मंत्रालयाकडून घेण्याचं काम सुरू झाल्याचं वृत्त एबीपी माझानं दिलं आहे. एनआयएला खुनाची केस थेट हाती घेण्याचा अधिकार नाही. पण मनसुख हिरेन यांच्या मृत्यूचा संबंध अंबानींच्या घराबाहेर सापडलेल्या कारशी आहे. अंबानींच्या घराबाहेर आढळलेली कार हिरेन यांच्याच मालकीची होती. त्यामुळेच हिरेन यांच्या मृत्यूचा तपास करण्याची तयारी एनआयएनं सुरू केली आहे. मनसुख हिरेन आणि सचिन वाझेंमधील संबंधांबाबत हिरेन यांच्या वकिलांचा मोठा गौप्यस्फोट, केला असा दावागृह मंत्रालयानं परवानगी दिल्यास एनआयए मनसुख हिरेन प्रकरणाचा तपास सुरू करेल. त्यासाठी गृह मंत्रालयाला ठाकरे सरकारची परवानगी घ्यावी लागणार नाही. त्यामुळे अंबानींच्या घराबाहेर सापडलेल्या कारपाठोपाठ आणखी एका प्रकरणाचा तपास एनआयएच्या हाती जाईल. तसं घडल्यास तो ठाकरे सरकारसाठी आणखी एक धक्का असेल. 

मनसुख हिरेन यांचा मृत्यू नेमका कशामुळे?मनसुख हिरेन पाणी पडले त्यावेळी काही वेळ ते जिवंत होते. त्यांच्या फुफ्फुसात खाडीचं पाणी गेल्यानं त्यांचा मृत्यू झाला, अशी माहिती डायटम बोन अहवालातून समोर आली आहे. त्याआधी हिरेन यांच्या मृत्यू प्रकरणी एक अहवाल काही दिवसांपूर्वी समोर आला होता. त्यात मनसुख यांनी स्वत:ला वाचवण्याचा थोडा प्रयत्न केला होता. मात्र त्यांच्या फुफ्फुसात जास्त पाणी आढळून आलेलं नाही, अशी माहिती शवविच्छेदन अहवालातून पुढे आली होती.डायटम बोन रिपोर्ट म्हणजे काय?वाहत्या पाण्यात डायटम नावाचा पदार्थ असतो. एखादी व्यक्ती पाण्यात बुडाल्यास त्याच्या शरीरात डायटम शिरतो. या व्यक्तीचा बुडून मृत्यू झाल्यास त्या व्यक्तीची डायटम टेस्ट पॉझिटिव्ह येते. पण मृतदेह पाण्यात फेकला गेल्यास त्याच्या शरीरात डायटमचा शिरकाव होत नाही. त्यामुळे त्याची डायटम टेस्ट निगेटिव्ह येते.

टॅग्स :सचिन वाझेमनसुख हिरणएटीएसउद्धव ठाकरेअमित शहा