Sachin Vaze: सचिन वाझे प्रकरणात अखेर 'त्या' मोदींची एन्ट्री; मुंबई पोलिसांचं टेन्शन वाढणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2021 04:13 PM2021-03-16T16:13:40+5:302021-03-16T16:14:08+5:30

mukesh ambani security scare: एनआयएचे डीजी मुंबईत दाखल; मुंबई पोलीस दलातील बड्या अधिकाऱ्यांची चौकशी करणार

mukesh ambani security scare nia dg y c modi lands in mumbai likely to investigate top officers of mumbai police | Sachin Vaze: सचिन वाझे प्रकरणात अखेर 'त्या' मोदींची एन्ट्री; मुंबई पोलिसांचं टेन्शन वाढणार?

Sachin Vaze: सचिन वाझे प्रकरणात अखेर 'त्या' मोदींची एन्ट्री; मुंबई पोलिसांचं टेन्शन वाढणार?

Next

मुंबई: उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर आढळून आलेल्या स्फोटकांनी भरलेल्या कार प्रकरणाचा (mukesh ambani security scare) तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून (NIA) सुरू आहे. या प्रकरणाचा तपास करणारे मुंबई पोलीस दलातील अधिकारी सचिन वाझे यांना अटक करणाऱ्या एनआयएनं आता पोलीस दलातील इतर बड्या अधिकाऱ्यांकडे मोर्चा वळवला आहे. त्याचसाठी एनआयएचे महासंचालक योगेश चंदर मोदी मुंबईत आले आहेत. 

अंबानींना घाबरवून निवडणुकीसाठी निधी गोळा करताय का?; भाजपचा शिवसेनेवर हल्लाबोल

एनआयएच्या महासंचालकांकडून मुंबई पोलिस दलातील मोठ्या अधिकाऱ्यांची चौकशी होण्याची शक्यता आहे. सध्या एनआयएच्या अटकेत असलेले सचिन वाझे चौकशीत सहकार्य करत नसल्याचं समजतं. याशिवाय वाझेंच्या वरिष्ठांच्या भूमिकेबद्दलही एनआयएला संशय आहे. त्यामुळेच एनआयएचे महासंचालक मुंबईत आले आहेत. योगेश मोदींनी या प्रकरणात व्यक्तीश: लक्ष घातलं आहे. एनआयएचे डीजीच चौकशी करण्यासाठी आल्यानं मुंबई पोलीस दलातले अनेक मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता आहे.

'ती' स्कॉर्पिओ चोरीला गेलीच नव्हती! 'दृश्यम' स्टाईल कथा उघडकीस; वाझेंचा पाय आणखी खोलात?

बड्या अधिकाऱ्यांची चौकशी होणार
सीआययू युनिटचे सहाय्यक पोलिस निरीक्षक (एपीआय) सचिन वाझेंना २५ मार्चपर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे. एनआयएचे पोलीस अधीक्षक दर्जाचे अधिकारी असलेले विक्रम खलाटे सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत. मात्र मुंबई पोलीस दलात अनेक वरिष्ठ आणि अनुभवी अधिकारी आहेत. त्यांची चौकशी योगेश मोदींकडून केली जाईल. यातून महत्त्वाची माहिती हाती लागण्याची शक्यता आहे. त्यातून प्रकरणाची दिशा निश्चित होऊ शकेल.

कोण आहेत योगेश चंदर मोदी?
योगेश चंदर मोदी हे १९८४ च्या आयपीएस बॅचचे अधिकारी आहे. तसंच मोदींचा कार्यकाळ हा मे २०२१ रोजी संपत आहे. २०१७ मध्ये वाय. सी. मोदींची एनआयच्या महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली. नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना गोध्र्यात दंगल झाली होती. त्यावेळी वाय. सी. मोदी पोलीस दलात होते. त्यांनी नरेंद्र मोदींना दंगल प्रकरणात क्लीन चीट दिली होती. गोध्रा दंगलीतल्या तीन महत्त्वाच्या प्रकरणांचा तपास त्यांनी केला होता. त्यात नरोडा गाव, गुलबर्ग सोसायटी आणि नरोडा पाटिया प्रकरणांचा समावेश होता.

Web Title: mukesh ambani security scare nia dg y c modi lands in mumbai likely to investigate top officers of mumbai police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.