लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : राज्य मार्ग परिवहन (एसटी) महामंडळाने प्रवासातील सवलतींकरिता आता 'नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड' (एनसीएमसी) अनिवार्य केले आहे. या कार्डची नोंदणी विभागीय कार्यालय आणि डेपोमध्ये सुरू करण्यात आली असून, महिन्याभरात १० लाख १५ हजार ३०० पेक्षा जास्त प्रवाशांची नोंदणी पूर्ण झाली आहे.
एसटीकडून विद्यार्थी, दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक, महिला, पुरस्कारार्थी आदी सुमारे ३५ प्रकारच्या प्रवाशांना विविध प्रकारच्या सवलती दिल्या जातात. या सवलतींचा लाभ घेण्यासाठी अनेकदा खोटे ओळखपत्र आणि कागदपत्रांचा वापर केला जात असल्याचे महामंडळ निदर्शनास आले होते. त्यामुळे योग्यप्रवाशालाच सवलतीचा लाभ घेता यावा. व्यवहारांमध्ये पारदर्शकता यावी म्हणून विविध सामाजिक सवलतींचा लाभ घेण्यासाठी 'एनसीएमसी' हे स्मार्ट कार्ड अनिवार्य असणार आहे. त्यामुळे सवलतींची अचूक नोंद, पारदर्शक प्रतिपूर्ती आणि रोखविरहित व्यवहार या तिन्ही गोष्टी एका कार्डमुळे शक्य होणार आहे.
लाभार्थ्यांना सुरुवातीला मोजावे लागणार १९९ रुपये
नवीन कार्डासाठी १९९ रुपये मोजावे लागणार आहेत. कार्ड जुने झाल्यावर १४९ रुपयांत पुन्हा नवीन कार्ड मिळणार आहे. कार्डमध्ये किमान १०० रुपये असणे अनिवार्य आहे. कार्डचा रिचार्ज ५० रुपयांच्या पटीत ईटीआयएम, अधिकृत संकेतस्थळ, अॅप, नियुक्त एजंटकडून करता येणार आहे.
कोणाला मिळणार लाभ?
पुरस्कारार्थी व पत्रकार : स्वातंत्र्यसैनिक, अधिस्वीकृतीधारक पत्रकार व राज्यस्तरीय पुरस्कार विजेत्यांना विभागीय कार्यालय येथील मुख्यालय आगारामार्फत वितरण.
विद्यार्थी: शालेय व तांत्रिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या 'सरल' क्रमांकाशी जोडलेले कार्ड दिले जाईल.
ज्येष्ठ नागरिक व महिलाः अमृत ज्येष्ठ नागरिक, सर्वसाधारण ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांना आधार संलग्न कार्ड मिळेल.
Web Summary : Maharashtra State Transport's NCMC card registrations surpass 1 million. This card is now mandatory for travel concessions, ensuring transparency and benefiting students, seniors, and others. The card costs ₹199, requires a minimum ₹100 balance, and can be recharged easily.
Web Summary : महाराष्ट्र राज्य परिवहन के एनसीएमसी कार्ड पंजीकरण 10 लाख से अधिक हुए। यह कार्ड यात्रा रियायतों के लिए अनिवार्य है, पारदर्शिता सुनिश्चित करता है और छात्रों, वरिष्ठ नागरिकों और अन्य को लाभ पहुंचाता है। कार्ड की कीमत ₹199 है, न्यूनतम ₹100 बैलेंस की आवश्यकता है, और इसे आसानी से रिचार्ज किया जा सकता है।