MPSC Exam : अखेर MPSC च्या पूर्व परीक्षेची तारीख ठरली, पुढच्या महिन्यातच पेपर होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2021 05:47 PM2021-08-04T17:47:55+5:302021-08-04T17:50:48+5:30

MPSC Exam : राज्यात या परीक्षेसाठी ४२ हजार ७०० उमेदवारांनी नोंदणी केली आहे. महाराष्ट्रात १०९ उपकेंद्रांवर परीक्षा होणार होती. प्रशासनाने यासंदर्भातील तयारीही केली होती, मात्र राज्यातील करोना संसर्गाची स्थिती दिवसेंदिवस बिघडत चालली होती

MPSC Exam : MPSC's pre-exam date has been fixed, the paper will be next month 4 september | MPSC Exam : अखेर MPSC च्या पूर्व परीक्षेची तारीख ठरली, पुढच्या महिन्यातच पेपर होणार

MPSC Exam : अखेर MPSC च्या पूर्व परीक्षेची तारीख ठरली, पुढच्या महिन्यातच पेपर होणार

Next
ठळक मुद्देमहाराष्ट्र लोकसेवा आयोगाची महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब ची संयुक्त पुर्व परीक्षा आता ४ सप्टेंबर २०२१ रोजी घेण्यात येत आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने तसे पत्रही जारी केलं आहे.

मुंबई - महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाने (MPSC) रविवारी ११ एप्रिल २०२१ रोजी होणारी राज्य सेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला होता. नवी तारीख आयोगामार्फत लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्‍त पूर्व परीक्षा कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव पाहता पुढे ढकलण्यात आली होती. आता, या परीक्षेच्या तारखेची घोषणा करण्यात आली आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ट्विटरवरुन यासंदर्भात माहिती दिली आहे. 

राज्यात या परीक्षेसाठी ४२ हजार ७०० उमेदवारांनी नोंदणी केली आहे. महाराष्ट्रात १०९ उपकेंद्रांवर परीक्षा होणार होती. प्रशासनाने यासंदर्भातील तयारीही केली होती, मात्र राज्यातील करोना संसर्गाची स्थिती दिवसेंदिवस बिघडत चालली होती. सरकारी यंत्रणेवरही यामुळे ताण होता. त्यामुळे ही परीक्षा लांबणीवर टाकण्याची मागणी लक्षात घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला होता. आता, राज्यातील कोरोना परिस्थिती बऱ्यापैकी आटोक्यात आल्यानंतर या परीक्षेची नवीन तारीख जाहीर करण्यात आली आहे. 


महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब ची संयुक्त पुर्व परीक्षा आता ४ सप्टेंबर २०२१ रोजी घेण्यात येत आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने तसे पत्रही जारी केलं आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही ट्विटरवरुन हे पत्र शेअर करत परीक्षेसंदर्भात माहिती दिली आहे. 
 

Web Title: MPSC Exam : MPSC's pre-exam date has been fixed, the paper will be next month 4 september

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.