Join us  

MPSC exam : 11 एप्रिल रोजीची MPSC परीक्षा पुढे ढकलली, सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: April 09, 2021 3:07 PM

राज्यातील एमपीएससीच्या परीक्षेबाबत यावेळी चर्चा झाली. राज ठाकरे यांनी वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर एमपीएससीची परीक्षा पुढे ढकला, अशी मागणी उद्धव ठाकरेंकडे केली होती

ठळक मुद्देराज्यातील एमपीएससीच्या परीक्षेबाबत यावेळी चर्चा झाली. राज ठाकरे यांनी वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर एमपीएससीची परीक्षा पुढे ढकला, अशी मागणी उद्धव ठाकरेंकडे केली होती

मुंबई - राज्यात 11 एप्रिल रोजी होणारी एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. मुख्यमंत्रीउद्धव ठाकरेंनी यासंदर्भात आज व्हर्च्युअल बैठक बोलावली होती. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, मंत्री एकनाथ शिंदे आणि अधिकारी यांच्यात व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही बैठक पार पडली. त्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे, गेल्या कित्येक दिवसांपासून एमपीएससी परीक्षेसंदर्भात विद्यार्थ्यांनी लावून धरलेल्या मागणीला यश आले आहे. 

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे रविवारी म्हणजेच 11 एप्रिलला महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा होणार होती. परंतु, या परीक्षेवर अनिश्चिततेचं सावट होतं. मात्र, परीक्षेबाबत सरकारकडून एमपीएससी प्रशासनाला कोणतीही सूचना मिळालेली नव्हती. त्यातच राज्य सरकारने 30 एप्रिलपर्यंत कठोर निर्बंध लावले असून शनिवारी आणि रविवारी असे दोन दिवस पूर्णपणे लॉकडाऊन आहे. त्यामुळे परीक्षा 11 एप्रिलला होणार का असा प्रश्न उपस्थित झाला होता. मात्र, आता ही परीक्षा होणार नसल्याचे निश्चित झाले आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत बेसुमार पद्धतीने वाढ होत आहे. (Coronavirus in Maharashtra) मोठ्या प्रमाणात होत असलेल्या रुग्णवाढीमुळे शासन आणि प्रशासन चिंतीत असून, राज्यात होणाऱ्या विविध अभ्यासक्रमांच्या आणि नोकरभरतीच्या परीक्षांबाबतही अनिश्चितता निर्माण झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आज सकाळीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना फोन केला होता. (coronavirus: Raj Thackeray calls Uddhav Thackeray regarding MPSC exams, Demand to postpone MPSC exam)

राज्यातील एमपीएससीच्या परीक्षेबाबत यावेळी चर्चा झाली. राज ठाकरे यांनी वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर एमपीएससीची परीक्षा पुढे ढकला, अशी मागणी उद्धव ठाकरेंकडे केली होती. राज ठाकरेंच्या या मागणीला उद्धव ठाकरे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला होता. त्यानंतर, काही वेळातच मुख्यंमत्र्यांनी बैठक बोलावली होती. त्या बैठकीत ही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, पुढील वेळापत्रक अद्याप जाहीर करण्यात आलं नाही. मात्र, 11 एप्रिल रोजी होणारी परीक्षा तात्पुरती रद्द झाली आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांत राज्यात कोरोनाचे ५० हजारहून अधिक रुग्ण सापडत आहेत. गुरुवारी महाराष्ट्रामध्ये ५६ हजार २८६ रुग्णांची नोंद झाली होती. तर दिवसभरात ३७६ रुग्णांचा मृत्यू झाला होता. 

अनेक नेत्यांनी केली होती मागणीराज ठाकरेंसह इतर नेत्यांनीही एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली होती. राज्य सरकारमधील मंत्री जितेंद्र आव्हाड यांनीही एप्रिल महिन्यात होणाऱ्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली आहे. तर, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, नरेंद्र पाटील यांनीही एमपीएससी परीक्षेसंदर्भात निर्णय घेण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली होती.   

टॅग्स :एमपीएससी परीक्षामुख्यमंत्रीउद्धव ठाकरे