Join us

एमपीएसीच्या प्रलंबित परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2020 19:17 IST

मात्र विद्यार्थ्यांना हवी परीक्षांचे सेंटर बदलण्याची संधी; संधी शक्य नसल्यास विद्यार्थ्यांना होम सेंटर देण्याची मागणी

मुंबई : महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) करोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर एप्रिल आणि मे महिन्यांमध्ये ज्या परीक्षा पुढे ढकलल्या होत्या, त्यांचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. बुधवारी १७ जून रोजी आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर हे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. यानुसार या परीक्षा 13 सप्टेंबर ते 1 नोव्हेंबरच्या काळात होणार आहेत.कोविड - 19 च्या वाढत्या प्रादुर्भावाच्या स्थितीच्या संदर्भात शासनाकडून वेळोवेळी राबवण्यात येणाऱ्या उपाययोजना व लॉकडाऊनचा कालावधी लक्षात घेऊन परीक्षेच्या आयोजनाच्या अनुषंगाने आयोगाकडून वेळोवेळी फेरआढावा घेण्यात येईल, असेही आयोगाने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. परीक्षांसंदर्भातील सर्व ताजी माहिती आयोगातर्फे संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. त्यामुळे उमेदवारांनी आयोगाच्या संकेतस्थळावर सतत अद्ययावत माहिती पाहात राहणे उमेदवारांच्या हिताचे राहील, असेही आयोगाने म्हटले आहे.  या वेळापत्रकानुसार होणाऱ्या परीक्षांचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे -१) राज्य सेवा पूर्व परीक्षा २०२० - १३ सप्टेंबर २०२०२) महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट - ब संयुक्त पूर्व परीक्षा २०२० - ११ ऑक्टोबर २०२०३) महाराष्ट्र अभियांत्रिका सेवा पूर्व परीक्षा २०२० - १ नोव्हेंबर २०२०  परीक्षांचे सेंटर बदलण्याची मागणीज्यावेळी विद्यार्थ्यांनी परीक्षांचे अर्ज भरले तेव्हा कोरोनाचे संकट नव्हते त्यामुळे बहुतांश विद्यार्थ्यांनी त्या वेळी परीक्षांचे सेंटर ज्या जिल्ह्यात ते अभ्यासाला होते तेच नमूद केले आहे. मात्र सध्यस्थितीत अनेक मुले आपापल्या गावी परतली आहेत, त्यामुळे त्यांनी जीतले सेंटर परीक्षांसाठी टाकले होते तेथे ते जाऊ शकत नाहीत. एमपीएससीच्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी 90 टक्के मुले ही स्पर्धा परीक्षांच्या सेंटरच्या ठिकाणी नसून आपल्या मूळ गावी आहेत. त्यामुळे या विद्यार्थ्यांना परीक्षांसाठी सेंटर बदलण्याची एक संधी देण्यात यावी जेणेकरून ते आपल्या जिल्ह्याच्या ठिकाणचे सेंटर परीक्षांसाठी निवडू शकतील अशी मागणी एमपीएससी समन्वय समितीकडून करण्यात आली आहे. सेंटर बदलण्याची संधी देणे शक्य नसल्यास सर्वच विद्यार्थ्यांना होम सेंटर देण्यात यावे अशी विनंती या समन्वय समितीच्या विद्यार्थ्यंकडून करण्यात आली आहे.

 

टॅग्स :परीक्षाएमपीएससी परीक्षाकोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरस