Join us

Navneet Rana VIDEO: रवी राणा लिलावतीत पोहोचले; पतीची भेट होताच नवनीत राणांना रडू कोसळले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2022 18:46 IST

बऱ्याच दिवसांनंतर पती पत्नीची भेट; नवनीत राणांना अश्रू अनावर

मुंबई: मुख्यमंत्र्यांच्या घराबाहेर हनुमान चालिसा म्हणणाऱ्या खासदार नवनीत राणा Navneet Rana आणि आमदार रवी राणांची रवानगी १२ दिवसांपूर्वी तुरुंगात झाली. अखेर कोर्टानं जामीन दिल्यानंतर दोघांची आज कारागृहातून सुटका झाली. तुरुंगातून सुटका होताच नवनीत राणा थेट लिलावती रुग्णालयात दाखल झाल्या. रक्तदाब, मणक्याचा त्रास होत असल्यानं नवनीत राणांनी रुग्णालय गाठलं. 

नवनीत राणा रुग्णालयात दाखल झाल्यानंतर थोड्याच वेळात त्यांचे पती रवी राणा त्यांची विचारपूस करण्यासाठी पोहोचले. रवी राणांना पाहून नवनीत राणांना अश्रू अनावर झाले. त्या रडू लागल्या. रवी राणांना तळोजा कारागृहात ठेवण्यात आलं होतं. आज सुटका झाल्यानंतर त्यांनी लिलावती रुग्णालय गाठलं आणि पत्नीची विचारपूस केली. बरेच दिवसांनंतर दोघांची भेट झाली. रवी राणांना पाहून नवनीत राणा ढसाढसा रडल्या.

रवी राणा लिलावती रुग्णालयापूर्वी भाजपचे नेते किरीट सोमय्या तिथे उपस्थित होते. सोमय्यांसोबत राणा लिलावती रुग्णालयात नवनीत राणांच्या भेटीसाठी पोहोचले. नवनीत राणांना स्पॉन्डेलिसिसचा त्रास आहे. त्यांना आधीच रुग्णालयात दाखल करायला हवं होतं. मात्र तुरुंग प्रशासनानं उशीर केला, असं रवी राणा लिलावती रुग्णालयाकडे जात असताना म्हणाले. रुग्णालयात जात असताना त्यांच्या हातात हनुमान चालिसा होती. त्यांनी अनेकदा ती प्रसारमाध्यमांना दाखवली.

टॅग्स :नवनीत कौर राणारवी राणा