एलफिन्स्टन दुर्घटनेनंतर खासदार किरीट सोमय्या गरबा खेळण्यात दंग? सोशल मीडियात टीकेचा भडीमार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2017 14:33 IST2017-10-01T07:29:43+5:302017-10-07T14:33:41+5:30

सध्या सोशल मीडियावर भारतीय जनता पक्षाचे खासदार किरीट सोमय्या यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये खासदार किरीट सोमय्या गरबा खेळताना दिसत आहेत.

MP Kirit Somaiya, after the Elphinstone mishap | एलफिन्स्टन दुर्घटनेनंतर खासदार किरीट सोमय्या गरबा खेळण्यात दंग? सोशल मीडियात टीकेचा भडीमार 

एलफिन्स्टन दुर्घटनेनंतर खासदार किरीट सोमय्या गरबा खेळण्यात दंग? सोशल मीडियात टीकेचा भडीमार 

ठळक मुद्देकिरीट सोमय्या गरबा खेळण्यात दंगसोशल मीडियात टीकेचा भडीमार 

मुंबई : सध्या सोशल मीडियावर भारतीय जनता पक्षाचे खासदार किरीट सोमय्या यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये खासदार किरीट सोमय्या गरबा खेळताना दिसत आहेत. मुंबईतील एलफिन्स्टन स्थानकच्या पुलावर शुक्रवारी (दि.29) झालेल्या चेंगराचेंगरीत 23 जणांचा नाहक मृत्यू झाला, तर अनेक जखमी झाले. या दुर्घटनेला 24 तास सुद्धा उलटले नाहीत. मात्र, खासदार किरीट सोमय्या गरबा खेळण्यात दंग असल्याने त्यांच्यावर सोशल मीडियात टीकेचा भडीमार होत आहे. 

व्हायरल झालेला व्हिडिओ हा खासदार किरीट सोमय्या यांचा एलफिन्स्टन दुर्घटनेच्या आधीचा आहे की त्यानंतरचा आहे. याबाबत अद्याप कोणतीही खात्रीशीर माहितीसमोर आलेली नाही. मात्र, यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरवरुन खासदार किरीट सोमय्या यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यांनी खासदार किरीट सोमय्या यांचा गरबा खेळतानाचा एक व्हिडिओ आपल्या ट्विटर अकाऊंटवर पोस्ट केला आहे. तर, दुसरीकडे सोशल मीडियात अनेक नेटिझन्सनी खासदार किरीट सोमय्या यांच्या या व्हिडिओवरुन जोरदार टीका केली आहे.


दरम्यान, खासदार किरीट सोमय्या यांनी या व्हिडीओ संदर्भात अद्याप काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही.





Web Title: MP Kirit Somaiya, after the Elphinstone mishap