मोटरमन केबिनला रेल्वे पोलिसांचा गराडा; केबिनमधून बाहेरच येईनात; हजारो प्रवासी अडकले
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2024 20:39 IST2024-02-10T20:38:36+5:302024-02-10T20:39:01+5:30
Mumbai Local Live Update: मुंबईत आज विचित्र प्रकार घडला आहे. मोटरमननी अचानक काम करण्यास नकार दिल्याने जवळपास १०० हून अधिक लोकल रद्द कराव्या लागल्या आहेत.

मोटरमन केबिनला रेल्वे पोलिसांचा गराडा; केबिनमधून बाहेरच येईनात; हजारो प्रवासी अडकले
मुंबईत आज विचित्र प्रकार घडला आहे. मोटरमननी अचानक काम करण्यास नकार दिल्याने जवळपास १०० हून अधिक लोकल रद्द कराव्या लागल्या आहेत. यामुळे हजारो प्रवासी सीएसएमटीसह रेल्वे स्थानकांवर खोळंबले आहेत. एका मोटरमनने आत्महत्या केल्याने मोटरमननी हे काम बंद आंदोलन पुकारले आहे.
प्रवाशांच्याही संतप्त प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. रेल्वे कर्मचारी उद्धटपणे वागत असल्याचा आरोप प्रवाशांनी केला आहे. गेल्या दीड दोन तासांपासून लोकल सेवा बंद आहे. मध्य आणि हार्बर लाईनवर जाणाऱ्या लोकल प्लॅटफॉर्मला लावून ठेवण्यात आल्या आहेत. अनाऊंसमेटही बंद आहे. यामुळे लोकल कोणत्या कारणासाठी रखडल्या आहेत याची माहिती प्रवाशांना शुक्रवारी मुरलीधर शर्मा या मोटरमनने आत्महत्या केली होती. रेल्वेचा रेड सिग्नल त्याने तोडला होता. यामध्ये कारवाई होईल म्हणून त्यान सँडहर्स्ट स्टेशन दरम्यान आत्महत्या केल्याचा दावा सहकाऱ्यांनी केला होता. तर रेल्वेने त्याचा अपघाती मृत्यू झाल्याचे म्हटले होते. त्याच्या अंत्यविधीला अन्य मोटरमन गेले होते.मिळत नाहीय
काऊंटरवर विचारण्यास गेलेल्या रेल्वे प्रवाशांना उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत. ट्रेन लावलीय ना जा आता असे सांगितले जात आहे.
प्रकार काय?
शुक्रवारी मुरलीधर शर्मा या मोटरमनने आत्महत्या केली होती. रेल्वेचा रेड सिग्नल त्याने तोडला होता. यामध्ये कारवाई होईल म्हणून त्यान सँडहर्स्ट स्टेशन दरम्यान आत्महत्या केल्याचा दावा सहकाऱ्यांनी केला होता. तर रेल्वेने त्याचा अपघाती मृत्यू झाल्याचे म्हटले होते. त्याच्या अंत्यविधीला अन्य मोटरमन गेले होते. या मोटरमनच्या मृत्यूचा निषेध करण्यासाठी या मोटरमननी आपण आता सिंगल ड्युटी करणार असून डबल ड्युटी करणार नाही असा पवित्रा घेतला आहे.